बोदवड : तालुक्यातील कोल्हाडी येथे एका बालिकेचे अपहरण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. दरम्यान, बालिकेला पळवून नेणाऱ्या आरोपीस अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन बालिकांना आरोपीने मारहाण केली. कोल्हाडी येथे ७ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रमोद एकनाथ ढाके यांच्या शेतातील घराजवळ आरोपी प्रकाश रतन बावसकर याने १२ वर्षीय बालिकेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळविले. बालिकेला पळवत असताना दुसऱ्या दोन बालिकांनी संशयित आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संशयित आरोपीने दोघा बालिकांना मारहाण केली व पळून गेला.या घटनेबाबतची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली आहे. त्यावरून अपहरण तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे करीत आहेत.
कोल्हाडी येथे बालिकेचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 16:23 IST
कोल्हाडी येथे एका बालिकेचे अपहरण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.
कोल्हाडी येथे बालिकेचे अपहरण
ठळक मुद्देआरोपी झाला फरारअडवण्यास गेलेल्या दोघा बालिकांना मारहाण