जळगाव : बोगस डॉक्टर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधी घेतल्याने किडनीला अपाय होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच ग्रामीण भागातील बाल रोग तज्ज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केल्यास अतिशय कमी खर्चात लहान मुलांची किडनी निकामी होण्यापासून वाचवू शकते, असा सूर रविवारी बालरोग तज्ज्ञांच्या परिषदेत उमटला.बाल किडनी फाऊंडेशन मुंबई आणि जळगाव बालरोग तज्ज्ञ संघटना यांच्यावतीने जागतिक किडनी दिवसाचे औचित्य साधून लहान मुलांच्या किडनी आजारावर एक दिवसीय परिषद रविवारी एका हॉटेलमध्ये पार पडली. यात जिल्ह्यातील १०० बालरोगतज्ज्ञांनी सहभाग नोंदवला.यात डॉ. कुमुद मेहता (वाडिया हॉस्पिटल, मुंबई), डॉ. उमा अली (लिलावती हॉस्पिटल मुंबई), डॉ. प्रीती शानबाग , डॉ. पवन देवरे (नवी मुंबई), डॉ. शिवहर सोनवणे (मुंबई ), डॉ पंकज भन्साली (औरंगाबाद) आदींनी मार्गदर्शन केले.१४ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर किडनी डे म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून ही परिषद आयोजित केली गेली. वैद्यकीय सेवेत प्रगती करुन बाल मृत्यू कमी करण्याचा संकल्प संघटनेने केला असल्याचे जळगाव बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ अजय शास्त्री यांनी सांगितले.चिटणीस डॉ. मंदार काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. शमीक सिंग, डॉ. स्वप्निल दसोरे, डॉ. अविनाश भोसले, डॉ. अविनाश खेलवाडे, डॉ. हितेंद्र भोळे, डॉ. ॅ अमित नारखेडे, डॉ. वृषाली सरोदे, डॉ. प्रीती जोशी, डॉ. सारिका सुरवाडे, डॉ. सारिका पाटील यांनी परिश्रम घेतले.यावेळी आलेल्या पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त केले.
बोगस डॉक्टरकडून औषधी घेतल्याने किडनी विकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 11:18 AM