जळगाव- शिक्षण प्रसारक मंडळाच्या प. न. लुंकड कन्याशाळेमध्ये नुकताच झालेला ‘कोजागिरी’ स्रेहमिलनाचा कार्यक्रम कलावंतांनी सादर केलेल्या बहारदार गीतांनी बहरला. यात सादर झालेल्या गीतांनी रसिक मंत्रमुध्द झालेले होते़ तर उत्कृष्ट गीत सादरीकरणामुळे वन्स मोअरचा आवाजही गुंजत होता.लुंकड कन्याशाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमेनिमीत्त मंडळाच्या सर्व शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कोजागिरी स्नेहमिलन सोहळा कै.डॉ.ह.य.बाकरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात श्रुती जोशी आणि तिच्या टीमन गीतांचे सादरीकरण केले़ तिला गायक व हार्मोनियम वादक सुरज बारी, तबला वादक गणेश शिंदे यांनी साथसंगत दिली. कार्यक्रमात त्यांनी बहारदार गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्याचबरोबर ला.ना.विद्यालयाच्या रेवती ठिपसे, कन्याशाळेचे शिवाजी सोनवणे, दिनेश वैद्य व अत्रे इंग्लिश मीडियमच्या तेजस्विनी पाटील यांनी देखील गाणी सादर केली. त्यात पाांडुरंग सोनवणे, उल्हास ठाकरे व सागर चौधरी यांनी साथसंगत दिली.प्रकट मुलाखतीने आणली रंगतकोजागिरी स्रेहमिलनाच्या कार्यक्रमातंर्गत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. सुशील अत्रे यांची प्रकट मुलाखत प्रिती झारे यांनी घेतली. त्यामुळे या कार्यक्रमात आणखी रंगत आली होती़ यावेळी कार्यक्रमात सचिव अभिजीत देशपांडे, पद्मजा अत्रे, पारसमल कांकरिया, प्रतिभा देशकर, विरेंद्र लुंकड, प्रतिमा अत्रे, अॅड. पंकज अत्रे, लक्ष्मी परांजपे, मीरा गाडगीळ, शूरपाटणे तसेच कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव, दुगार्दास मोरे, ज.प्र.कुळकर्णी, रेखा चंद्रात्रे, साधना महाजन, उषा बावस्कर आदींची उपस्थिती होती़ सूत्रसंचालन कुमुदिनी मराठे व रमा तारे यांनी केले.