जि. प. समोर खोदकाम
जळगाव : जिल्हा परिषदेसमोर मल्लनिस्सारण योजनेचे काम सुरू आहे. मोठे खड्डे खोदण्याचे दिवसभर काम सुरू होते. रस्त्याच्या अगदी मधोमध हे खोदकाम सुरू असल्याने दिवसभर या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. जुन्या इमारतीतून नवीन इमारतीत जाताना कसरत करावी लागत आहे.
केंद्रावर गर्दी
जळगाव : कोरोना चाचणी केंद्रावर तपासणीसाठी गर्दी होत असून सायंकाळी उशीरापर्यंत रांगा लागत असल्याचे चित्र आहे. दिवसभरातून साडे पाचशे तपासण्या सरासरी दररोज असून गेल्या पंधरा दिवसात ही संख्या वाढली आहे. गेल्या महिन्यात अगदी कमी प्रमाणात चाचण्यांसाठी लोक समोर येत होते.
स्थायीत होणार चर्चा
जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक १५ रोजी होणार आहे. आगामी अर्थसंकल्पीय बैठक नेमकी कशी घ्यायची याबाबत या सभेत निर्णय होणार आहे. ही सभा ऑफलाईन की ऑनलाईन घ्यायची याबाबतचा हा निर्णय असेल. जि. प. त कोरोना वाढत असल्याने दक्षता म्हणून गर्दी टाळली जात आहे.
बायेमॅट्रीक बंद
जळगाव: जिल्हा परिषदेत कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने बायोमॅट्रीक हजेरी सोमवारपासून तात्पुरत्या पद्धतीने बंद करण्यात आली आहे. यातून संसर्ग होण्याचा धोका असल्याने सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला आहे. जि. प. त कोरोनामुळे अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत.