भूषण श्रीखंडे
जळगाव : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसावर आला असून कोकणातील चाकरमानी तसेच कोकणात गणेशोत्सव पाहण्यासाठी जाणाऱ्यांसाठी नागरिकांसाठी जळगाव एसटी विभागाने १९५ एसटी बसेसचे नियोजन केले आहे. शुक्रवार (ता. १५) पासून या बसेस कोकण सवारीसाठी निघालेल्या आहे.
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. या उत्सवाला कोकणामध्ये जाणारे चाकरमानी तसेच तेथील नागरिक हे कोकणातील गणेश उत्सव पाहण्यासाठी जात असतात. त्यामुळे जळगाव एसटी विभागाने गणेश उत्सवानिमित्त १९५ एसटी बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यात काही नालासोपारा, पालघर येथून आधीच बुक झाल्या आहे. तेथून या बसेस पुढे पेण, वाडा कोकणातील आदी गावांमध्ये या धावणार आहे.
मुंबई मार्गे कोकणात
जळगाव विभागाच्या एसटी बसेस या मुंबई येथील नालासोपारा, पालघर येथे जाऊन तेथील कोकणात गणेशोत्सवात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या गावी सोडणार आहे. त्यामुळे एसटीने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा गाड्या मिळणार आहे.
रक्षाबंधन सणाला ज्याप्रमाणे जळगाव एसटीला चांगले उत्पन्न मिळाले त्याचप्रमाणे गणेशोत्सवात देखील जळगाव एसटी विभागाकडून एसटीच्या फेऱ्या कोकणात पाठविल्या जाणार आहे. पालघर, मुंबई येथून काही गाड्या बुकिंग देखील झाल्या असून याचा एसटीच्या उत्पन्न वाढीत फायदा होईल.- भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, एसटी विभाग, जळगाव.