तालुक्यातील सुरवाडे शेत व बोदवड वन हद्दीत गट क्र. ६९ मध्ये कौसल्याबाई पुंडलिक शेळके यांचे दोन हेक्टर शेत असून, शेतात दोन हेक्टरात त्यांनी भुईमूग तसेच मका लागवड केलेली आहे. त्यात काही ठिकाणी मका उगवला आहे, मात्र भुईमूग अद्याप उगवलेला नसताना जंगली वन्य प्राण्यांनी शेतात टाकलेले भुईमूग व मक्याचे पीक कोरून कोरून फस्त केले आहे. सदर शेतात शेतकरी आज सोमवारी गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. शेताची अवस्था पाहून ते हवालदिल झाले आहेत. याबाबत त्यांनी मुक्ताईनगर वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार दिली असून, पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे, तर अशाच प्रकारे या परिसरातील आजूबाजूच्या शेतातही वन्यप्राण्यांनी नुकसान केले आहे
—-
सदर नुकसान झालेले शेतातील मक्याचे पीक वन्य प्राण्यांनी नासधूस केले, तर दुसऱ्या फोटोत शेतात वन्यप्राण्याचा फोटो सोबत पाठवला आहे, २९/ ९/१०