जळगाव : जिल्ह्यात कोविड १९ साठी जी यंत्रणा आहे. ती पुन्हा सज्ज करण्यात आली आहे. त्यात डेडिकेटेड कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा आपात्कालिन परिस्थितीसाठी तयार करण्यात आले आहेत. तसेच ॲम्ब्युलन्स देखील तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी आरोग्य विषयक बैठक पार पडली. त्यात राऊत यांनी संबधिंत अधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले. राऊत यांनी सांगितले की, जिल्ह्यात १०८ या क्रमांकावर उपलब्ध होणाऱ्या ३२ रुग्णवाहिका आहेत. त्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यातील चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोविड बाबतचे प्रशिक्षण पुन्हा देण्यात येणार आहेत. त्यांना रुग्णांना कसे हाताळायचे याची माहिती देण्यात येणार आहे.’