अजय पाटीलजळगाव - सोशल मीडियावर काही दिवसांपासून सप्तपर्णी या वृक्षाबाबत संदेश व्हायरल केले जात असून, यामध्ये अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी या गैरसमजातूून सप्तपर्णी या वृक्षांवर कुºहाड टाकली जात आहे. पर्यावरण तज्ज्ञ व वनस्पती अभ्यासकांच्या मते सप्तपर्णी हे वृक्ष आरोग्यासाठी अपायकारक नसून, सोशल मीडियाव्दारे पसरविण्यात येत असलेले संदेश केवळ गैरसमजातून पसरविले जात असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.लवकर वाढ होणारा व कोणत्याही ऋतूत चांगली सावली देणारा व नेहमी हिरवेगार वृक्ष म्हणून सप्तपर्णी ओळखला जातो. त्यामुळे प्रत्येक शहर असो गावात अनेक घरांसमोर, शाळा, महाविद्यालयाचा परिसर, रस्त्यांचा दुतर्फा असो वा उद्याने या ठिकाणी सप्तपर्णी वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड सध्या केली जात आहे.काय आहेत गैरसमज१. सप्तपर्णी हे वृक्ष विदेशी वनस्पती असून, अत्यंत विषारी आहे. तसेच हे वृक्ष अत्यंत विषारी वायु उत्सर्जित करत असते जो श्वासाव्दारे आपल्या शरिरात गेल्याने आपणास उलटी, मळमळ, डोकेदुखी होते.२. या वृक्षामुळे पचसंस्थेचे आजार, अजीर्ण, अपचन, वात व पित्तासह श्वसनसंस्थेचे श्वसनदाह, आॅक्सीजनची कमतरता, कफ, श्वास घेण्यास त्रास दम्यासह विषारी वायू शरिरात गेल्याने अल्सर व कॅन्सर सारखे गंभीर आजार होतात.काय आहे सत्य१. सप्तपर्णी विदेशी की विदेशी वृक्ष नसून हे वृक्ष भारतीय उपखंडातच मुख्यत्वेकरून आढळते. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात फुले येतात. फुलांच्या काळात काही प्रमाणात वास येतो. त्यामुळे ज्यांना अॅलर्जीचा त्रास आहे, त्यांना या वासामुळे डोकेदुखीचा त्रास जाणवतो.२. कॅन्सर, अल्सर असे कोणतेही आजार या वृक्षामुळे होत नसून, विकीपीडयाच्या संदर्भानुसार सप्तपर्णीचा आयुर्वेद, युनानीत परंपरागत औषधी पद्धतीत वापर केला जातो. खोडाची साल हगवण, जुलाब, मलेरियातील ताप, फीट, अस्थमा, कातडी विकार, सर्पदंश इत्यादी बरे करण्यासाठी केला जातो. खोडाची साल कडवट तुरट असते. ही साल मलेरियातील तापासाठी उत्तम असते.सप्तपर्णीबाबत हे जाणून घेणेही महत्वाचे* सप्तपर्णी हे वृक्ष पश्चिम बंगालचे राज्यवृक्ष असून, रविंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या बंगालमधील विश्व भारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात विद्यार्थ्यांना पदवीसोबत सप्तपर्णी या वृक्षाचे पाने दिले जातात.* सप्तपर्णीचे शास्त्रीय नाव ‘अल्स्टोनिया स्कॉलरिस’ हे आहे. मलेरिया या खोडाच्या सालीपासून बरा होत असल्याने या वृक्षास ‘इंडियन सिंकोना’ असेही म्हणतात. खोडातून येणारा पांढरा चीक अल्सर बरा करण्यासाठी वापरला जातो.नियमित हिरवेगार असल्याने वृक्षांची अती लागवडपर्यावरण अभ्यासक बाळकृष्ण देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार हे वृक्ष नियमित हिरवेगार असल्याने सध्या या वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात फुले येण्याचा काळात वास येतो. मात्र, हा ती वास अनेकांना सहन होत नाही. त्यातच आॅक्टोबर महिना हा पावसाळा संपून हिवाळा सुरु होण्याचा काळ आहे. अशा वातावरण बदलाच्यावेळी अनेकांना फ्ल्यू, ताप, सर्दी खोकला असे त्रास होत असतात. मात्र, अनेकदा याच वृक्षांच्या वासामुळे हा त्रास होत असल्याचा समज अनेकजण करून घेतात.सप्तपर्णी हे वृक्ष विषारी नसून ते गुणकारी आहे. किडे व पतंगासाठी हे वृक्ष आवडीचे असून, या वृक्षाच्या वासामुळे कुठलेही गंभीर आजार होत नाही. सोशल मिडियावर चुकीचे संदेश व्हायरल केले जात असून, यामुळे वृक्ष तोडणे चुकीचे आहे.-मिलींद गिरधारी, वनस्पती शास्त्र व पर्यावरण अभ्यासक, औरंगाबादसप्तपर्णी या वृक्षाच्या वासामुळे अनेकांना त्रास जाणवतो. मात्र, हा त्रास वृक्षाला येणाऱ्या फुलांच्या काळातच येतो. या वृक्षातून द्रव बाहेर पडते. या काळात वृक्षाजवळ किडक देखील जात नसतात.- प्रा.डॉ.एल.पी.देशमुख, पर्यावरण अभ्यासक व नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य
गैरसमजातून ‘सप्तपर्णी’ वर कु-हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 9:47 PM