यावल : सर्वत्र कोरोना संसर्गाची भीती असतांना तालुक्यातील सौखेडासीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी सकाळी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कोणताही कर्मचारी हजर नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी सौखेडा येथील रहिवासी तथा पं. स. चे काँगे्रसचे गटनेते शेखर पाटील यांच्याकडे केल्यांनतर त्यांनी केंद्रात येत चौकशी केली असता कोणीही कर्मचारी आढळून न आल्याने या आरोग्य केंद्रास कुलूप ठोकले.सौखेडा हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने येथील आरोग्य केंद्रात सातपुड्यातील वस्त्या -पाड्यावरील आदिवासी येतात. शनिवारी सकाळी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कोणीही कर्मचारी नसल्याची ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय झाली. याची दखल घेत शेखर पाटील हे रुग्णालयात आले असता त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेशी दुरध्वणीवरून संपर्क साधत या ठिकाणची परिस्थिती मांडली. येथील बेजबाबदार कारभाराने संतप्त झालेल्या पाटील व ग्रामस्थांनी या केंद्रास कुलूप लावले. सध्या कोरोना संसर्गाची सर्वत्र भीती असल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व रुग्णालये खुले ठेवण्यासंदर्भात आदेशीत केल्यांनतरही सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले हे रुग्णालय मात्र बंद होते. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कडक कारवाईचा इशारा दिल्यानंतर सर्वांचे समाधान झाले.नोटीस बजावणारशनिवारी सकाळी रुग्णालयात केवळ एक शिपाई हजर होता. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने रुग्णांनी संताप केल्यावरून पं. स. सदस्य शेखर पाटील व ग्रामस्थांनी कुलूप लावल्याची माहिती मिळाली असून अनुपस्थित राहणाºयांवर कारवाई करण्याचे सांगितल्या नंतर कुलूप लगेच उघडण्यात आले असून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमत बºहाटे यांनी दिली.
आरोग्य केंद्रास ठोकले कुुुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 9:12 PM