अमळनेर, जि.जळगाव : सद्गुरू संत सखाराम महाराज द्विशताब्दी महोत्सवात महाविष्णूू पंचायतन यागात प्रचंड उत्साह आणि भक्तीभावाने चारशेहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला.शनिवारी या यज्ञाची पूर्णाहुती वाडी संस्थानचे गादीपती संत प्रसाद महाराज यांच्या हस्ते झाली. यात संस्थानचे विश्वस्त व द्विशताब्दी कार्यालयाचे व्यवस्थापक अनिल घासकडबी, मनोज भांडारकर उपस्थित होते. श्री तुकाराम महाराजांच्या गाथेच्या सामुदायिक पारायणात दिवसेंदिवस अधिक वाढ होऊन साडेतीन हजार भाविकांनी गाथा पारायण केले.नेत्र चिकित्सा व तपासणी यांचे कार्य कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने पार पडले. यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना संत सखाराम महाराज संस्थानतर्फे काळे चष्मे वितरित करण्यात आले. दिव्यांग साहित्य वाटपाला प्रचंड प्रतिसाद आल्याने वाटप स्वीकारण्यासाठी आलेल्या दिव्यांगांना नियंत्रित करण्यासाठी अनेक स्वयंसेवक कार्यरत होते. ठिकठिकाणाहून आलेल्या दिव्यांग व्यक्तींना ५० सायकल रिक्षा, ५० कमोड खुर्ची, १० व्हील चेअर्स, १०० आधारकाठ्या, २५ वाकर्स व कुबड्या वाटप करण्यात आल्या.सायंकाळी चार ते पाच व पाच ते सहा या प्रवचन सत्रात अनुक्रमे नाशिकचे वेदमूर्ती अतुलशास्त्री भगरे व गिरणात मल्यनाथ महाराज संस्थान यांचे अधिपती श्रद्धेय गुरुबाबा महाराज औसेकर यांचे सुंदर प्रवचन झाले. रात्री कीर्तन सप्ताहात वासकर पिठाचे अधिपती विठ्ठल महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. सोहळ्याच्या सातव्या दिवशी प्रचंड उत्साही भाविकांनी सहभाग घेतला. २० हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.संत सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी सोहळ्यात धार्मिक कार्यक्रमासोबत ऊर्जा बचतीसाठी २७ रोजी सायंकाळी साडे सात वाजता बोरी नदी परिसरात सर्व विजेचे दिवे बंद करून महादिपोत्सव साजरा करण्यात येणार होता मात्र हा कार्यक्रम २७ रोजी झाला नसून तो २८ रोजी होणार आहे. शहरातील नागरिकांनी देखील १५ मिनिटे विजेचे दिवे बंद करून पणत्या दिवे देवासमोर लावून शुभम ... करोती ... कल्याणम .. मंत्र म्हणावा असे आवाहन संत सखाराम महाराज यांनी केले आहे.
कुंडी महाविष्णू पंचायतन महायज्ञाची पूर्णाहुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:58 AM
सद्गुरू संत सखाराम महाराज द्विशताब्दी महोत्सवात महाविष्णूू पंचायतन यागात प्रचंड उत्साह आणि भक्तीभावाने चारशेहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला.
ठळक मुद्देसंत सखाराम महाराज समाधी महोत्सवविविध शिबिरार्र्थींना साहित्याचे वाटपअमळनेरच्या बोरी नदी पात्रात आज महादीपोत्सव