कजगाव, ता. भडगाव : वरुणराजाच्या कृपादृष्टीसाठी गेल्या २०० वर्षापूर्वी घालुन दिलेली कुवारी पंगतची प्रथा कजगावकर आजही मोठ्या श्रद्धेने पार पाडत आहेत. श्रावण महिन्यात गुरुवारी या पंगतीचे आयोजन करण्यात येत असते. यानुसार २२ रोजी ही पंगत घालण्यात आली.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावकऱ्यांनी दर्ग्यावर शाल चढविली. या नंतर कुवारी पंगतीस सुरुवात करण्यात आली. शेकडो बालकांनी गोड भाताचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिनेश पाटील, अरूण पाटील, राजेंद्र पाटील, शरद पाटील, निलेश पवार, सुनिल पाटील, भूषण पाटील, दादाभाऊ पाटील, नीलेश महाले, जयपाल पाटील, कुमार पाटील, नाना धोबी, मैमूद शाह , लक्ष्मन पाटील, अतुल पाटील, एकनाथ पाटील, भैय्या पाटील, संजय महाजन, तुषार अमृतकार, संदिप पाटील, कोमल पाटील कैलास पाटील, नरेंद्र पाटील, तेजस न्याती, सनी पाटील, छोटू जैन, प्रकाश जैन, ज्ञानेश्वर पवार, नितीन पाटील, चिंतामण साठे, गोपाल पवार, राहूल पाटील यांनी परिश्रम घेतले.कुवारी पंगतची आख्यायिकादोनशे वर्षापूर्वी येथील गढीमध्ये बुरुज बनवुन एक फकीर बाबा आपल्या रखवालदारासह राहु लागला होता. दरम्यान परिसरात दुष्काळ सदृश्य परस्थिती निर्माण झाली होती. संपुर्ण गावकरी भाईकनशा फकीर बाबाच्या बुरुजा जवळ जमले व आपली व्यथा मांडली असता बाबांनी सांगितले की, संपूर्ण गावातुन यथाशक्ती रोख स्वरूपात किंवा अन्न धान्य स्वरूपात वर्गणी गोळा करा आणि संपूर्ण गावात गोड भाताची पंगत कुवारींना द्या. बाबाच्या या आदेशानुसार गावकऱ्यांनी गुरुवारी कुवारी पंगतीचे आयोजन केले आणि पंगतीच्यावेळी काही वेळातच मेघराजा जोरदार बरसला. संपूर्ण गावात आनंद उसत्व साजरा झाला दुष्काळी परिस्थिती बदलली. तेव्हा पासून गावकºयांनी कुवारी पंगतीची प्रथा कायम सुरू ठेवली आहे. दमदार पाऊस झाला तरी किंवा पाऊसाने दडी मारली तरी कुवारी पंगतीचे आयोजन दरवर्षी केले जाते.बाबांनी जिवंत समाधी घेतलीज्या बाबांनी कजगावात कुवारी पंगतीची प्रथा घालून दिली त्या बाबांनी आपल्या वृद्धापकाळात त्या काळी तितुर नदीच्या काठी घनदाट अरण्यात जिवंत समाधी घेतली. ते समाधी स्थळ आज हिंदू मुस्लीमाचे श्रध्दास्थान बनले आहे.दर वर्षी पोळ्याच्या दुसºया दिवशी बाबांच्या नावाचा उरूस भरविण्यात येतो. कुस्त्याची दंगल, तमाशा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.