जामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव जाणवत असल्याने रूग्णांचे व येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत.दरम्यान, या प्राथमिक आरोग्य केंद्राला २८ गावे जोडली आहेत. जवळपास निम्मा तालुका या प्राथमिक आरोग्य केंद्रास जोडला आहे. तरी या आरोग्य केंद्रात लांबून रूग्ण उपचारासाठी येत असतात. आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा नसल्याने अनेक वेळा येथील वैद्यकीय अधिकारी हे बाहेरून औषध साठा घेण्याचा रूग्णांना सल्ला देतात. येथील रूग्णाच्या रक्त व लघवीचे नमुने हे तपासणीसाठी पाठविले असता ते पंधरा-पंधरा दिवस त्यांचे रिपोर्ट रुग्णालयात प्राप्त होत नसल्याने रूग्णांकडून अनेक वेळा तीव्र संताप व्यक्त होत आहे.तसे या ठिकाणी गरोदर महिलांसाठी मानव विकास कार्यक्रम घेण्यात येतात. त्या महिलांना मध्यान्न भोजनाची व्यवस्था करण्यात येत परंतु तोही सकस आहार मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक वेळा महिला करतात व या भोजनाची व्यवस्था रूग्णालयाच्या आवारात उघड्यावर करण्यात येतात. प्रसूतिसाठी आलेल्या महिलांना शासनाच्यावतीने जी आर्थिक मदत मिळते ती वर्ष उलटूनही मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी अनेकदा केलेल्या आहेत व असा प्रकार शनिवारी येथील आरोग्य केंद्रात पाहण्यास मिळाला. येवती येथील महिलेने आर्थिक मदतीबाबत विचारणा केली असता त्या महिलेला टोलवाटोलवीची उत्तरे या महिलेस देण्यात आली.याचबरोबर येथील रूग्णालयात अनेक रूग्ण उपचारासाठी येतात तर त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करून येथील रुग्णालय परिसरात पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यात आली आहे. या टाकीत अद्यापही पाण्याचा एक थेंबही टाकण्यात आला नाही व हजारो रुपये खर्च करून पाण्याचे आर.ओ.मशीन हे पाण्याअभावी धुळखात पडून आहे.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांंची पदे आहे त्या एकच वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहे तेही या रूग्णालयात मुख्यालयीन राहत नसल्याने रूग्णांना रात्रीच्या वेळेस उपचार घेणे असल्यास रूग्णांना ना वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नाईलाजास्तव खासगी रूग्णालयात धाव घ्यावी लागते.रूग्णालयातील काही कर्मचारीही मुख्यालयीन राहत नसल्याने व कार्यालयीन वेळेवर यात असल्याने रूग्णालयातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रूग्णालय परिसरातून अनेकदा मैल्यवान वस्तूंचीही चोरी झालेली आहे. त्यासाठी कायम शिपाई या रूग्णालयात वास्तव्यात पाहिजे, अशी कायम मागणी होत आहे.गरोदर व प्रसूतिसाठीच्या महिलांसाठी शासनाच्यावतीने १०२ ही रुग्णवाहिका येथील रूग्णालयात कार्यरत असताना शही राजकीय दबावापोटी येथील रुग्णवाहिका मुक्ताईनगर तालुक्यातील कुºहा काकोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आली, तर येवती प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गरोदर महिलांना प्रसूतिसाठी खासगी वाहनाचा वापर करावा लागतो. यात नाहक भूर्दंड सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.