जळगाव : मालवाहतुकदारांच्या संपामुळे २६ जुलैपासून खतांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव रेल्वे धक्क्यावर येणा-या खतांच्या रॅकची वाहतूक थांबली असून परिणामी खतांची टंचाई निर्माण होण्याची भिती आहे.सध्या युरिया व पोटॅशचा तुटवडा जाणवत आहे. ही पिकांना खत देण्याची वेळ असल्याने खतांची टंचाई झाल्यास शेतक-यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा फर्टिलायझर, पेस्टीसाईडस् अॅण्ड सीडस् डिलर्स असोसिएशन, कृषी विभागाचे अधिकारी यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन लक्ष घालण्याची मागणी केली. जिल्हाधिका-यांनी त्यानुसार मालवाहतुकदार संघटनेच्या जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून खतांची वाहतूक सुरू करण्याची सूचना केली. मात्र खते जिवनावश्यक वस्तूंमध्ये येत नसल्याचे सांगत संघटनेने जिल्हाधिका-यांची विनंती धुडकावली.
मालवाहतुकदारांच्या संपामुळे जळगावात युरिया, पोटॅशचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 7:23 PM
मालवाहतुकदारांच्या संपामुळे २६ जुलैपासून खतांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव रेल्वे धक्क्यावर येणा-या खतांच्या रॅकची वाहतूक थांबली असून परिणामी खतांची टंचाई निर्माण होण्याची भिती आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भिती२६ जुलैपासून बंद आहे खतांची वाहतूककृषी विभागाच्या अधिका-यांनी लक्ष घालण्याची जिल्हाधिका-यांना केली विनंती