पारोळा : मुलगा होत नसल्याने जन्मदात्यांनीच दीड वर्षाच्या मुलीला विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार टिटवी (ता. पारोळा) येथे दीड महिन्यानंतर उघडकीस आला. याप्रकरणी आई-वडिलांविरूद्ध पारोळा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक रघुनाथ पवार व र}ाबाई पवार (रा. टिटवी) या दाम्पत्यास पाठोपाठ तीन मुली झाल्या. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून 19 जानेवारी 17 रोजी दीपक पवार याने आपल्या दीड वर्षाच्या मुलीच्या डोक्यावर मारीत तिला बेशुद्ध केले. त्यानंतर गावालगत असलेल्या विहिरीत फेकून दिले. त्या मृत बालिकेची ओळख पटविण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते. बेवारस म्हणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या सर्व घटनाक्रमात र}ाबाईने पतीला साथ दिली होती. दरम्यान, पारोळा पोलीस स्टेशनचे कॉ. पंढरीनाथ पवार, भगवान साळुंखे, कैलास शिंदे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरविली. मृत बालिकेची आई र}ाबाई ही घटना घडल्यापासून दोन्ही मुलींसह दहिवद-पातोंडा येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून दीपक व त्याच्या शेजारच्यांची चौकशी केली. 4त्यांनतर पोलिसांनी दीपकला पोलिसी हिसका दाखविताच त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मुलगा होत नसल्याच्या कारणाने मुलीला विहिरीत फेकल्याची कबुली दिली. दीपकला अटक केली आहे. तपास उपनिरीक्षक आर.जे. दहीहंडे करीत आहेत.
मुलगा होत नाही म्हणून बापाकडून लेकीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2017 1:31 AM