शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

लडाख आॅन व्हील्स : अमळनेरच्या अधिकाऱ्याची पत्नीसह बुलेटवर लडाखस्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:37 PM

बुलेटवरच भूतानची वारी

चुडामण बोरसेजळगाव : कला आणि छंदातून माणसाचे व्यक्तीमत्व घडत असते. पर्यटनासारखा वेगळा छंद जोपासत अमळनेर येथील अजित मुठे आणि नेहा मुठे या दाम्पत्याने थेट बुलेटवर लडाखवर स्वारी केली.मे २०१८ मध्ये लडाखचा हा रोमांचकारी अनुभव घेत हे दाम्पत्य परतले आहे.मुठे हे अहमदनगर येथे स्पेशल आॅडीटर म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांचे वास्तव्य नाशिक येथे आहे. यापूर्वी गेल्या वर्षी त्यांनी बुलेटवरच भूतानची वारी केली होती.अजित यांना लहानपणापासूनच पर्यटनाचा छंद आहे. दरवर्षी ते नवीन ठिकाणी सपत्नीक भटकंती करीत असतात... विशेष म्हणजे ही भटकंती बुलेटवर असते.मे २०१८ मध्य नाशिक ते श्रीनगर हा रेल्वेने प्रवास. नंतर श्रीनगर येथूून या जोडप्याने बुलेट भाड्याने घेतली. याच बुलेटवरुन जवळपास १६०० किलोमीटरचा खडतर प्रवास केला. यात मग श्रीनगरसह कारगील, लेह असे अनेक अनेक टप्पे पार करीत बुलेटस्वारी पूर्ण केली.या बुलेटस्वारीत सर्वात खडतर प्रवास झाला तो ‘झोजीला पास’ चा. काश्मीरच्या लडाख सेक्टरला जोडणारा हा सर्वात धोकादायक व अखंड बर्फ असलेला रस्ता. या झोजीला पासबाबत असे म्हटले जाते की, ‘झोजिला मे नही गिरे, तो क्या गिरे’अशा या वेड्यावाकड्या वळणाच्या अत्यंत खडतर रस्त्यावर बुलेट चालविताना देव आठविल्याशिवाय राहत नाही. हा पासही या जोडप्याने सहज पार केला.अजित यांच्या गु्रपमध्ये ४६ जण होते. त्याच आठ जोडपी होती. जी बुलेटवर होती, त्यात केरळहून पाच, गुजरातहून दोन व महाराष्ट्रातून अजित आणि त्यांच्या पत्नी. बाकी सर्व यंग बॉईज कर्नाटका, राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश येथून आलेले होते.सन १९९९ च्या युद्धाने आपल्याला कारगिल माहित झाले. मात्र प्रत्यक्षात वर्षानुवर्षे आपले जवान शत्रूशी निसर्गाशी, प्रतिकुल परिस्थितीत तोंड देऊन दिवसरात्र जाता पहारा देत असतात.कारगिल, बटालीक व द्रास असे सेक्टर आहे. यातील कारगिल सेक्टरमध्ये टायगर हिल, द्रास सेक्टरमध्ये टोलोलिंग ही शिखरे आहेत. या ठिकाणी कॅप्टन विक्रम बात्रा, कॅप्टन मनोज पांडे, रायफलमन संजयकुमा२२र, योगिदरसिंग यादव यांनी पराक्रमाची शर्थ केली होती. या ठिकाणी कॅप्टन मनोज पांडे स्मारक आहे.यासर्व विरांना ‘मानाचा मुजरा’ अर्पण करून कारगिल येथे मुक्काम झाला. आणि ११ दिवसांचा लडाख प्रवास सुखकर तेवढाच रोमांचकारी आणि आठवणीत राहिल, असा झाला.अजित हे २०१२ मध्ये काश्मीर गेलो होते. त्यावेळ जागोजागी व ५०, १०० मीटर्स अंतरावर जवान बंदोबस्तासाठी उभे होते. त्यावेळची काश्मीरची परिस्थिती धगधगती होती. आता २०१८ साली फारच कमी बंदोबस्त दिसला. लाल चौकातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते आणि तेथे फक्त १०-१५ पोलीस होते. हे बदलेले चित्र सुखदायक असल्याचा अनुभव ते सांगतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव