शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

‘त्या’ महिला डॉक्टरने लिहिली आत्महत्येपूर्वी ११ पानांची चिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 11:56 AM

वाघळूद, ता.धरणगाव येथील सासर व कठोरा, ता.जळगाव येथील माहेर असलेल्या डॉ. स्वाती अभिजीत पाटील (वय २३) यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अकरा पानांची चिठ्ठी लिहून ठेवलेली होती व त्यात सासरकडील मंडळी गर्भ श्रीमंत असतानाही माहेरुन महागड्या चैनीच्या वस्तू आणाव्यात म्हणून कसा छळ करण्यात येत होता याबाबत चिठ्ठीतउल्लेख केला आहे.

ठळक मुद्देमहिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण गर्भ श्रीमंत असतानाही पैशांसाठी छळपती, सासू व सासरे फरार

आॅनलाईन लोकमत, जळगाव-दि.४,वाघळूद, ता.धरणगाव येथील सासर व कठोरा, ता.जळगाव येथील माहेर असलेल्या डॉ. स्वाती अभिजीत पाटील (वय २३) यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अकरा पानांची चिठ्ठी लिहून ठेवलेली होती व त्यात सासरकडील मंडळी गर्भ श्रीमंत असतानाही माहेरुन महागड्या चैनीच्या वस्तू आणाव्यात म्हणून कसा छळ करण्यात येत होता याबाबत चिठ्ठीतउल्लेख केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या चिठ्ठया जप्त केल्या आहेत.डॉ.स्वाती पाटील यांनी २५ जुलै रोजी दुपारी बारा वाजता राहत्या घरात वरच्या मजल्यावर पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कठोरा, ता.जळगाव येथे घडली होती. स्वाती पाटील यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी बोराडी, ता.शिरपूर येथे बीएएमएसचे शिक्षण पूर्ण केले व आत्महत्येच्या आदल्या दिवशीच त्यांची डॉक्टर म्हणून नोंदणीही झाली होती.  हुंडा व सोने देऊनही अपेक्षा अपूर्णचस्वाती पाटील यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, वडील सुनील पाटील यांनी लग्नात मनाप्रमाणे हुंडा व सात तोळे सोने दिले होते. तरीही काय दिले तुझ्या वडीलांनी असे टोमणे सासरे डॉ.गोपाळ पाटील व सासू मिराबाई यांच्याकडून मारले जात होते. आता वाशिंग मशिन, फ्रीज व बेडरुमध्ये फर्निचर तसेच महागडा मोबाईल आदी वस्तू तुझ्या वडीलांना घ्यायला सांग, असा आग्रह त्यांच्याकडून होता. आपल्याकडे इतका पैसा असतानाही शेतकरी असलेल्या वडीलांकडे किती  मागायचे. सर्व मलाच दिले तर मागे भाऊ पण आहे, त्याला काय देणार असे स्वाती या वारंवार सांगत      होत्या. तुमच्या प्रियासारखी मी एकटी नाही. बर दिले तरी तुमची नवीन अपेक्षा असतेच. तरीही दररोज काही ना काही कारणाने छळ सुरुच होता. पती डॉ.अभिजीत यांना सांगितले तर तू माझ्यामागे कटकट लावू नको असे सांगतात. पतीच ऐकून घेणार नाही तर मग मी कोणाकडे सांगू असेही त्यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.

खूप छान गिफ्ट दिले मलाडियर अभिजीत, खूप छान गिफ्ट दिले तुम्ही मला थर्टी फर्स्टचे. मला रडताना पाहून तुम्हाला खूप आनंद झाला असेल ना. कारण लिहून यासाठी सांगते की, तुम्हाला तर माझ्याशी बोलायला वेळच नाही. बीझी लोक ना तुम्ही. मी बोलले   की, तुम्हाला किरकिर वाटते. एक डॉक्टर असूनही माझ्या नैसर्गिक अडचणी तुम्ही समजून घेतल्या  नाहीत, असेही चिठ्ठीत लिहिले आहे.

पती, सासू व सासरे फरारआत्महत्येपूर्वी लिहिलेली ही चिठ्ठी तीन दिवसानंतर कुटुंबाला आढळली व ती त्यांनी पोलिसांकडे सादर केली. त्यामुळे पती डॉ.अभिजीत पाटील, सासरे डॉ.गोपाळ पाटील व सासू मिराबाई पाटील या तिघांविरुध्द २८ जुलै रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाधिकारी डी.बी.पाटील, जितेंद्र पाटील यांचे एक पथक वाघळूद, पिंप्री व धरणगाव येथे तिघांच्या शोधार्थ गेले असता दवाखाना व घराला कुलूप आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार तिघांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.

बैठक ठरली होती निष्फळस्वाती पाटील यांचा सासरच्यांकडून छळ होत असल्याने दोन्हीकडील कुटुंब व नातेवाईकांची बैठक घेण्याचा निर्णय २२ जुलै रोजी झाला २४ रोजी आजोबांकडे झुरखेडा, ता.धरणगाव येथे बैठक झाली. याबैठकीत   वडीलांचे ऐकूण घेण्यात आले नाही. इकडे वडीलांची जेमतेम परिस्थिती तर दुसरीकडे सुशिक्षीत व गर्भश्रीमंत असतानाही सासरच्यांकडून नवनवीन अपेक्षा यामुळे प्रचंड नैराश्य आल्याने दुसºयाच दिवशी स्वाती  यांनी घरात आत्महत्या केली.