या तलावात पूर्णपणे गाळ व झाडेझुडपे, वेलींचा वेढा दिसून येतो. हा तलाव पूर्णपणे स्वच्छ करण्यात यावा व सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून तेथील रहिवासी व गावातील नागरिक करत आहेत. जेणेकरून त्या परिसरातील पाणीटंचाई देखील दूर होईल तेथील पाणीसाठा जास्त प्रमाणात असून आजूबाजूला असलेले बोअरवेल विहीर यांनाही चांगले पाणी असते.
प्रशासनाकडून दुर्लक्ष
तलावाकडे न.पा. प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. पाणीटंचाईच्या काळात तलाव मोठा आधार ठरत असतो. गेल्या काही वर्षांपूर्वी स्वर्गीय लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांनी तलाव स्वच्छ करण्यासाठी स्वतः उतरून मेहनत घेतली परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते अपूर्ण राहिले.
त्याच पद्धतीने इंदिरा कन्या शाळेच्या मागील बाजूस असलेला तलावाची ही दुरवस्था आहे.
दोन कोटींचा निधी
धरणगाव नगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत टिळक तलाव संवर्धनासाठी दोन कोटी निधी मंजूर झालेला असून कामासाठी २५ लाख रुपये आता नगरपालिकेत प्राप्त झालेला आहे. मात्र फक्त कागदोपत्रीच नोंदी दिसून येते त्यासाठी कुठलीही प्रत्यक्षात कार्यवाही केलेली दिसून येत नाही.
प्रशासनाने लवकरात लवकर पावसाळा सुरू होण्यापूर्वी तलावातील गाळ काढावा अशी मागणी होत आहे.
फोटो - २७सीडीजे ६