वरणगाव, ता. भुसावळ : येथिल सिध्देश्वर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे पुलाखाली नेहमीच पाणी साचलेले असते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.वरणगांव शहर अनेक उपविभागात विभागले गेले आहे. त्यापैकी सिध्देश्वरनगर हा भाग रेल्वे स्टेशनच्या पार पलिकडे आहे. तेथे जाण्यासाठी रेल्वेच्या पुलाखालून अथवा रेल्वे लाईन ओलांडून जावे लागते. परंतु रेल्वे पुलाखाली नेहमी पाणी साचलेले असते व पावसाळ्यात तर तेथे खूपच बिकट परिस्थिती असते. त्यामुळे नागरिकांचे खूपच हाल होतात . नाईलाजाने नागरिक रेल्वे रुळ ओलांडून जातात व जीवालाही धोका असतो. आताच दोन दिवसांपूर्वी एका अंगणवाडी सेविकेला रेल्वेच्या धक्यामुळे आपले दोन्ही पाय गमवावे लागलेत. बºयाचदा पाणी काढले जाते मात्र पुन्हा तीच स्थिती होते, तरी पुलाखालील पाण्याचा कायमचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी सिध्देश्वर नगर वासियांनी केली आहे.
रेल्वे पुलाखाली साचला जणू तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 7:25 PM