पारोळा : बालाजी संस्थांच्या बालाजी मंदिराच्या हुंडीतील पैशांची मोजदाद केली असता सव्वापाच लाखांची रोकड व सोन्याच्या नाण्यांसह सोन्याच्या व चांदीच्या वस्तू भाविकांनी दान केल्या. ३ रोजी ८ महिन्यांपासून भाविकांनी बालाजी मंदिराच्या दानपेटीत व हुंडीत यथा शक्तीने दान केलेल्या पैशांची मोजणी मंदिराच्या सभागृहात करण्यात आली.सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ही मोजणी सुरु होती. त्यात ४ लाख ७४ रुपयांच्या सर्व प्रकारच्या नोटा आणि ५१ हजार ७४० रुपयांची चिल्लर निघाली. एक ग्रॅम वजनाचे ६ नाणी व अर्धा व एक ग्रॅमची सोन्याचे तुकडे, टिकली, अशा एकूण १० ग्रॅमच्या सोने, चांदीचे डोळे, पादुका असे दागिने भाविकांनी दान केली होती.दानाची मंदिराच्या सुविधांसाठी वापरला जाईल, असे संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत शिंपी यांनी सांगितले. दानाच्या पैशांचा उपयोग केवळ श्रीच्या मंदिरात भाविकांना सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी उपयोग केला जाईल असे संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले यांनी सांगितले.
पारोळ्यात बालाजींच्या हुंडीत सव्वापाच लाखांचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 4:36 PM
बालाजी संस्थांच्या बालाजी मंदिराच्या हुंडीतील पैशांची मोजदाद केली असता सव्वापाच लाखांची रोकड व सोन्याच्या नाण्यांसह सोन्याच्या व चांदीच्या वस्तू भाविकांनी दान केल्या. ३ रोजी ८ महिन्यांपासून भाविकांनी बालाजी मंदिराच्या दानपेटीत व हुंडीत यथा शक्तीने दान केलेल्या पैशांची मोजणी मंदिराच्या सभागृहात करण्यात आली.
ठळक मुद्देसोन्याची नाणी, चांदीच्या वस्तूही मिळाल्यादानाची रक्कम वापरली जाणार मंदिराच्या सुविधांसाठीआठ महिन्यांनंतर केली दानपेटीतील पैशांची मोजणी