पहूर कसबेतील प्रतिष्ठित भुसार मालाचे व्यापारी व प्रगतिशील शेतकरी दगडू बिंबाजी जाधव हे पहूरसह परिसरातील सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जायचे. आज ते हयात नाहीत. १९८४ मध्ये सुधाकर गणपत बोरसे (८४) दोन्ही मित्र. या कालखंडात बोरसेंनी जाधवांकडून तीन एकर जमीन पंधरा हजारांवर गहाण ठेवून मुलीच्या विवाहासाठी व्यवहार केला. तीन एकर जमिनीपैकी दोन एकर जमीन धरणात गेली. यापोटी दगडू जाधव यांनी पन्नास हजार पुन्हा सुधाकर बोरसे यांना दिल्याचा व्यवहार झाल्याचे दोन्हीकडून सांगण्यात आले. एकूण पासष्ट हजाराचा व्यवहार तोंडी होता.
३७ वर्षांनी व्यवहाराला उजाळा
सुधाकर बोरसे हे औरंगाबाद येथे परिवारासह वास्तव्यास आहे. कोरोना काळात परिवारासोबत चर्चेतून तीन एकर जमिनीचा विषय समोर आला. १९८४ मध्ये झालेल्या व्यवहारासंदर्भात बोरसेंचे चिरंजीव डॉ. दिनेश बोरसे यांनी आपली वडिलोपार्जित जमीन आठवण म्हणून असावी, या उद्देशाने दगडू जाधव यांचे चिरंजीव शंकर जाधव यांच्याशी संपर्क साधला व जमिनीच्या व्यवहार बोलणे झाले. शंकर जाधव यांनी सकारात्मकता दाखविली.
शंकर जाधव यांच्याकडून जमीन परत
शंकर जाधव यांनी औरंगाबाद येथे प्रत्यक्ष जाऊन मूळ मालक सुधाकर बोरसेंची भेट घेतली. वडिलांनी केलेल्या व्यवहाराची माहिती जाणून घेतली. यात शंकर जाधव यांचे चुलतभाऊ युवराज जाधव यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली व व्यवहारात तिसऱ्या कोणत्याही माणसाला न घेता, विशेष म्हणजे वाजागाजा न करता, कोर्टकचेरी न दाखविता, भांडणतंटा दूर सारून बाजारभावाप्रमाणे आज लाखांची असलेली जमीन मूळ रक्कम पासष्ट हजारात आनंदाने जाधवांनी परत केली.
वडिलांच्या हस्ते मैत्रीच्या नात्यातून विश्वासाने झालेला व्यवहार होता. पहूरसह परिसरात वडील दगडू जाधव यांची सेवाभावी वृत्ती म्हणून ओळख होती. या नात्यातून माणुसकी, विश्वास जिवंत राहावा व वडिलांनी केलेल्या व्यवहाराला तसेच त्यांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची काळजी घेऊन मी स्वतः मूळ मालकाला जमीन परत केली आहे.
-शंकर दगडू जाधव, सरपंच.
दगडू जाधव यांचे चिरंजीव यांनी विश्वासाने हा व्यवहार केला. अनेक वेळा जमिनीसंदर्भात दगडू जाधव यांच्याशी चर्चा केली; पण याला त्यांनी तडा जाऊ दिला नाही. जमिनीच्या उताऱ्यावर कोणताही फेरफार केला नाही. माणुसकी व प्रामाणिकपणे त्यांचा मुलगा शंकर जाधव यांनी जमीन मूळ रकमेत मला परत दिली. वडिलोपार्जित जमीन परत मिळाल्याचा मनस्वी आनंद असून वडिलांच्या हस्ते या व्यवहाराला तडा जाऊ दिला नाही, हे विशेष.
-सुधाकर गणपत बोरसे,
निवृत्त लिपिक, औरंगाबाद
===Photopath===
220621\22jal_1_22062021_12.jpg~220621\22jal_2_22062021_12.jpg
===Caption===
शंकर जाधवसुधाकर बोरसे~शंकर जाधवसुधाकर बोरसे