ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 17 - इंडियन प्रिमीअर लीग (आयपीएल) च्या अंतिम फेरीत पुणे सुपरजायंट संघाने धडक मारली असून, अद्याप दुसरा संघ ठरलेला नाही. 19 मे रोजी होणा:या क्वॉलीफायरच्या सामन्यानंतर दुसरा संघ ठरणार आहे. मात्र आतापासून सट्टा बाजारात अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारेल यासाठी बुकींकडून सट्टा लावला जात आहे. 21 मे रोजी होणा:या आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी जळगावात सुमारे 20 लाखांचा सट्टा लागला असल्याची माहिती बुकींनी दिली आहे. अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स व पुणे सुपरजायंटचे संघ एकमेकांना भिडणार असल्याचा अंदाज शहरातील सट्टा व्यवसायातील बुकींनी काढला आहे. तसेच स्पर्धेत विजयी ठरणा:या संघाप्रमाणे ऑरेंज व पर्पल कॅप कोणता खेळाडू पटकावेल यावर सुध्दा शहरात सट्टा लावला जात आहे. आयपीएलच्या सामन्यांमध्ये पुण्याचा संघ यंदा नावाप्रमाणेच ‘जायंटकिलर’ ठरला आहे. क्वॉलीफायर व एलीमेनेटर च्या सामन्यांआधी मुंबई इंडियन्स व केकेआर बुकींच्या पसंतीला होते. मुंबईचा भाव 25 पैसे व केके आरचा भाव 50 पैसे इतका होता. त्या खालोखाल हैदराबादवर 75 तर पुण्याचा संघाला 1 रुपया असा भाव देण्यात आला होता. मात्र पुण्याचा संघाने अंतीम सामन्यात धडक मारुन बुकींचे सर्व गणित बिघडवले आहे. तर मुंबई व पुणे संघादरम्यान मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यान मुंबईवर 25 पैसे तर पुण्यावर 75 पैसे भाव होता. मात्र मुंबई हरल्याने पुण्याचा संघावर सट्टा लावणा:यांचे नसीब फडकले आहे.
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी जळगावात लाखोंचा सट्टा
By admin | Published: May 17, 2017 6:51 PM