पहूर (ता जामनेर) : पहूर पेठ येथील रहिवासी ललित मदनलाल लोढा यांची भाजप व्यापारी आघाडी जळगाव जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी ते जामनेर तालुका भाजप व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष होते.
फोटो
चोपड्यात रॅकेट सापडण्याची शक्यता
चोपडा : चोपड्यात ५०० रुपयांच्या सहा नोटा बनावट आढळून आल्या आहेत. यामुळे या भागात बनावट नोटा चलनात आणणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी या दृष्टीनेही तपास करावा, अशी मागणी आहे.
नुकसानभरपाई मिळण्याची मागणी
डोंगर कठोरा, ता. यावल : शेतकऱ्याच्या खळ्यास आग लागून म्हशींचे तीन पारडू होरपळून ठार झाले, तर चार पारडू गंभीररीत्या भाजले. यात युवराज गणपत भिरुड शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आहे.