कोपर्डीतील लेकीसाठी प्रत्येक तालुक्यात लागणार एक दिवा
By admin | Published: July 12, 2017 12:40 PM
कोपर्डीतील अमानवी अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेला १३ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे़
आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १२ - कोपर्डीतील अमानवी अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेला १३ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे़ या लेकीसाठी बुधवारी जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्यात शहरातील मुख्य चौकात एक दिवा प्रज्वालित करून श्रध्दांजलीपर संवेदना व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती मराठा विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डी़डी़बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली़एक दिवा लेकीसाठी याअंतर्गत कोपर्डीतील लेकीला श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे़ त्याबाबत माहिती देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाव्दारे नूतन मराठा महाविद्यालयातील जगदीशचंद्र बोस सभागृहात पत्रकार परिषद झाली़ अॅड़ विजय पाटील, संगीता पाटील, डॉ़ राजेश पाटील, श्रध्दा पाटील, नगरसेविका लीना पवार, विनोद देशमुख, संदेश भोईटे, चंद्रकांत कापसे, बाळासाहेब सूर्यवंशी, भिमराव मराठे, संजय पवार, बाळासाहेब सूर्यवंशी, हेमंतकुमार साळुखे, प्रमोद पाटील, श्रीराम पाटील, सचिन सोमवंशी, अॅड़सचिन चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील, प्रा़राजेंद्र देशमुख, प्रा़सुनील गरुड आदी उपस्थित होते़शासनाची जलदगतीने न्याय देण्याची घोषणा पोकळ ठरलीलेकीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाव्दारे राज्यभर मूक मोर्चा काढण्यात येऊन शासनाने लक्ष वेधण्यात आले होते़ सरकारतर्फे सहा महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टाव्दारे न्याय देण्याची घोषणा केवळ पोकळ ठरली़ त्यामुळे जलद न्यायाच्या मागणीसाठी तसेच सरकारव्दारे वेळकाढूपणाच्या वृत्तीला लगाम लावण्यासाठी अवघा मराठा समाज १३ रोजी एकत्र येत आहे़ प्रत्येक तालुक्यात, शहरातील प्रमुख चौकांमध्ये एकत्र येऊन एक दिवा प्रज्वालित करावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे़ यात कुठल्याही घोषणा, कुठलीही प्रार्थना, तसेच वाहतुकीला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे़काळ्या फित लावून काम कराघटनेच्या निषेधार्थ गृहिणी, नोकरदार, शेतकरी, मजूर, विद्यार्थी, डॉक्टर, वकील, शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यावसायिक, उद्योजक तसेच शेतकरी आदी सर्वांनी उजव्या हाताला काळ्या रिबीन लावून कामकाज करावे़ असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाव्दारे करण्यात आले आहे़