नशिराबाद, जि. जळगाव : तिसºया रेल्वे लाईनच्या विस्तारीकरणासाठी शेतकºयांच्या शेतजमिनी पोलीस बंदोबस्तात गुरुवारी ताब्यात घेण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. मात्र प्रशासकीय कारण दाखवित बैठक व कारवाई स्थगित करण्यात आली. प्रशासनाच्या भूमिकेच्या विरोधात शेतकºयांनी संताप व्यक्त केला. शेतजमिनीला योग्य तो मोबदला मिळावा व मागण्या मान्य न झाल्यास रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा शेतकºयांनी या वेळी दिला. तरसोद रेल्वे गेटजवळ गुरुवारी शेतकरी कुटुंबासह उपस्थित होते.प्रशासनाच्या दडपशाहीचा निषेधयोग्य तो मोबदला न देता दडपशाहीचा वापर करणाºया प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत तरसोद, नशिराबाद, असोदा येथील शेकडो शेतकºयांनी तरसोद रेल्वे फाटकाजवळ आंदोलन केले व सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला. या वेळी राजेंद्र चौधरी, किसन झटके, रवींद्र नारखेडे, महेश माळी, सतीश कावळे, पद्माकर बºहाटे, मिलिंद कौंडिण्य, दीपेश भोळे, चंदन अत्तरदे, भगवान देवरे, विशाल नारखेडे, पंढरीनाथ बºहाटे, गोपाल भोळे, राहुल झटके, दिलीप चौधरी, योगेश बºहाटे यांच्यासह अनेक शेतकरी, महिला परिवारासह उपस्थित होते.जबरदस्तीे ताबा घेण्याचा प्रयत्न करू नकाशेतकºयांच्या सर्व मागण्या मान्य करा व त्याबाबतचे लेखी आश्वासन द्या मगच जमिनीचा ताबा घ्या. जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्यास आत्महत्या करू, असा निर्धार शेतकºयांनी व्यक्त केला. आता या प्रश्नी रेल्वे प्रशासन नक्की काय भूमिका घेते? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.रास्त मोबदला न मिळाल्याने शेतकरी हवालदिलजळगाव-भुसावळ तिसºया रेल्वे लाईन विस्तारीकरणासाठी भूसंपादनाचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. जमिनीचा मोबदला अगदी कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोबदला वाढीसाठी शेतकºयांनी अनेकदा आंदोलने केली.त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी बाजारभाव व त्याच्या चारपट रक्कम देण्याचे आश्वासन दिल्याने त्या वेळी उपोषण मागे घेण्यात आले होते. शासनाच्या आदेशानुसार सानुग्रह समितीची नियुक्ती करण्यात आली. समितीने पूर्वी झालेल्या चुका मान्य करून अंशत: अनुदान दिले. मात्र सानुग्रह समितीच्या आकडेवारीतसुद्धा पुन्हा चुका झालेल्या आहेत. शेतकºयांनी त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी बाजारभाव व त्याच्या चारपट रक्कम देण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. शासनाच्या आदेशानुसार सानुग्रह समितीची नियुक्ती करण्यात आली. समितीने पूर्वी झालेल्या चुका मान्य करून अंशत: अनुदान दिले. मात्र सानुग्रह समितीच्या आकडेवारीतसुद्धा पुन्हा चुका झालेल्या आहेत. शेतकºयांनी त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. मात्र प्रशासनाने त्यास बगल देत दडपशाहीचा वापर करीत ५ जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात शेतजमिनी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत तरसोद गणपती मंदिर येथे बैठकीचे नियोजन होते. त्यासाठी अनेक शेतकरी उपस्थित होते. मात्र आजची कारवाई स्थगित असल्याची माहिती तलाठी रूपेश ठाकूर, पी.एम. बेंडाळे यांनी शेतकºयांना दिली.
जळगाव-भुसावळ तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी भूसंपादन :शेतक-यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:33 PM
तरसोद रेल्वे फाटक येथे आंदोलन
ठळक मुद्देयोग्य मोबदला मिळावाप्रशासनाच्या दडपशाहीचा निषेध