अमळनेर, जि.जळगाव : तब्बल दोन वर्षांनंतर पाडळसरे धरणांतर्गत येणाºया सात्री गावातील ३५ शेतकऱ्यांना भूसंपादनाचा ५० टक्के मोबदला मिळाला आहे. यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी प्रांताधिकाºयांची भेट घेऊन आगाऊ अनुदान देण्यास सहकार्य केले.तालुक्यातील सात्री हे गाव पाडळसरे धरणांतर्गत पूर्ण जाणार आहे. २००३ मध्ये त्याचा सर्व्हे करण्यात आला होता. २०१५ मध्ये अवॉर्ड जाहीर करून जमिनीचा ताबा शासनाने घेतला होता. गेल्या दोन वर्षांपासून चार कोटी रुपये येऊन पडले होते. त्यातील ३५ शेतकºयांनी त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात ५० टक्के रक्कम दोन कोटी ८० लाख रुपयांची मागणी केली होती. बन्सीलाल बोरसे, मनोहर पाटील, सुधाकर बोरसे, अशोक बोरसे, बाळू पाटील, शालिक पाटील, सोमनाथ पाटील, एकनाथ पाटील, रमेश पाटील, महेंद्र पाटील, चुनिलाल पाटील, राजमल पाटील, नत्थू न्हावी, चिंधाबाई भिल, परशुराम पाटील, गव्हरलाल पाटील, रामचंद्र पाटील, राजेंद्र पाटील, अशोक पाटील आदी शेतकरी त्यांच्या संपादित जमिनीचा ५० टक्के आगाऊ मोबदला मागत होते. मात्र प्रशासनाकडून मोबदला मिळत नसल्याने ललित बोरसे, अनिल पाटील, अशोक पाटील, शालिक पाटील, प्रभाकर बोरसे आदींसह शिष्टमंडळाने आमदार शिरीष चौधरी यांची भेट घेतली. त्यांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांची भेट घेऊन ५० टक्के रक्कम आगाऊ देण्याचा आग्रह धरला आणि ३५ शेतकºयांना रकमा देण्यात आल्यात. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे
दोन वर्षांनंंतर मिळाले शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:19 PM