वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय व राज्य शासनाच्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लॅपटॉपद्वारे राजुरी बुद्रूक, ता.पाचोरा येथील प्रगतीशील शेतकरी अनंतराव एकनाथ पाटील यांच्याशी १४ जानेवारी रोजी दुपारी ११.४० ते २.५८ या वेळेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत थेट संपर्क साधला.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील १३ शेतकºयांशीसुद्धा लोकसंवाद कार्यक्रमात थेट मंत्रालयातून संवाद साधला. अनंतराव एकनाथ पाटील यांच्याशी दुपारी १.४५ वाजता संपर्क साधला. विशेष म्हणजे अनंतराव पाटील यांच्या शेतातून थेट संपर्क साधला तेव्हा त्यांच्या पत्नी वैशाली आनंदराव पाटील यादेखील उपस्थित होत्या.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास गेल्या चार वर्षात शासनाच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळाला, कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या, शासन राबवत असलेल्या योजनांबाबत आपण समाधानी आहात का, असे विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारले. त्यावर उत्तर देताना अनंतराव पाटील यांनी सांगितले की, मला कृषी विभागाकडून वारंवार सहकार्य तसेच मार्गदर्शन मिळत असते. आतापर्यंत कृषी विभागाकडून रोटाव्हेटर, पावर टिलर, ट्रॅक्टर यासारखी कृषी उपयोगी अवजारे मिळाल्याचेदेखील त्यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच श्रीकांत पाटील, प्रवीण पाटील, प्रेमचंद पाटील, किशोर उभाळे, घनश्याम पाटील, राहुल पाटील यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कृषी अधिकारी दीपक ठाकूर, पांडुरंग ठाकूर, विनोद पाटील, कृषी पर्यवेक्षक एस. पी.पाटील, कृषी सहाय्यक दीपक पाटील आदी उपस्थित होते.
लोकसंवाद कार्यक्रमाद्वारे राजुरी बुद्रूक येथील शेतकऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला थेट संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 4:59 PM
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय व राज्य शासनाच्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लॅपटॉपद्वारे राजुरी बुद्रूक, ता.पाचोरा येथील प्रगतीशील शेतकरी अनंतराव एकनाथ पाटील यांच्याशी १४ जानेवारी रोजी दुपारी ११.४० ते २.५८ या वेळेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत थेट संपर्क साधला.
ठळक मुद्देजिल्हा माहिती अधिकारी कार्यालय व राज्य शासनाच्या कृषी विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात संवादचार वर्षात शासनाच्या कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळाला, कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या?शासन राबवत असलेल्या योजनांबाबत आपण समाधानी आहात का, असे विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारले.