डी.बी. पाटील
यावल : किनगाव जवळील ‘या’ अपघात स्थळावर आतापर्यंत २० जणांचे बळी गेले आहे. असे असताना या ठिकाणी संभाव्य अपघात स्थळाचे साधे फलकही नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाबद्’ल नाराजी व्यक्त होत आहे. हे अपघातग्रस्त स्थळ किनगाव-यावल रस्त्यावर किनगाव पासून सुमोर एक कीमी अंतरावर आहे. या स्थळापासून सुमारे ५० मीटरवर एल आकराचे तीव्र वळण असून वळणाच्या कडेस मोठमोठी झुडूपे वाढलेली आहेत. या वळणाआधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतेही सावधगिरीचे फलक लावलेले नाही. दरम्यान रविववारी झालेल्या भिषण अपघाताची माहिती मिळताच अपघात स्थळी जळगावचे अधिक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, यावलचे उपअभियंता जे. ए. तडवी, शाखा अभियंता अजीत निंबाळकर यांनी धाव घेत रस्त्याची पाहणी केली. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे, अपघातानंतर डागडुजीयावलपासून किनगाव पर्यत अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून ते अपघातास निमंत्रण देत आहेत.येथील भारत डेअरीपासून तर वनविभागाच्या कार्यालयापर्यंत , चुंचाळे फाटयाचा परीसर आदी ठिकाणी हे खडडे आहेत. नामुष्की टाळावी म्हणून सोमवारी त्या ठिकाणावर डांबराचे ड्रम्स पाठवून खडडे बुजविण्याचे कामास सुरवात झाली असली तरी कोणत्याही घटनेच्या अगोदर हे काम का केले जात नाही असा प्रश्श्नही सर्वसामान्य नागरीकांकउून विचारला जात आहे. याच ठिकाणी होतात वारंवार अपघात ज्या ठिकाणी हा अपघात झाला आणि ज्या हड्डूच्या झाडावर ट्रक आदळली त्याच झाडाच्या अगदी समोर २००६ मध्ये बाभळीच्या झाडावर आदळून ट्रकच्या छतावर बसलेले दोन मजुर ठार झाले होते आणि महीलेचे मुंडके बाभळीच्या झाडास लटकलेले होते हा तर दोन वर्षापुर्वी याच ठिकाणी असलेल्या वळणावर मोटरसायकलीच्या अपघातात दोघे जण ठार झाले होते. त्यामुळे या स्थळानेच गेल्या काही वर्षांमध्येच २० जनांचा बळी घेतला असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडत नसून किमान या स्थळावर संभाव्या अपघात स्थळाबाबत सूचना फलक तरी लावावे अशी मागणी होत आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच किनगावचे पोलीस पाटील सचिन नायदे, संजय पाटील, डॉ. योगेश पालवे, उपसरपंच लुकमान तडवी, अमीन मीस्त्री, खलीलशहा, रफीक तडवी यांचेसह गावातील अनेक ग्रामस्थांनी सहकार्य केले
यावल रुग्णालयात अनेकांचे सहकार्य भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी हे वृत्त कळताच यावलला धाव घेत मृतदेह नेण्यासाठी वाहने, मृतदेहासाठी कपडे उपलब्ध करुन दिले. तसेच स्वत. मृतदेह आणून वाहनात ठेवण्याचे काम केले. सुमारे चार तास ते रुग्नायातच थांबुन होते. आमदार शिरीष चौधरी, ज़ि प. सदस्य प्रभाकर सोनवणे, कदिरखान, शेखर पाटील, पं. स. सभापती दिपक पाटील, अनिल जंजाळे,नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, अभिमन्यु चौधरी, पुंडलीक बारी, आर. पी. आयचे आनंद बाविस्कर , करीम मन्यार , समीर मोमीन यांचेसह अनेकांनी रुग्नालयात सहकार्य केले.