शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

जळगावात गणेश मूर्ती घडविण्याची कामे अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 2:54 PM

शहरातील अजिंठा रोडवर यावर्षीही या ठिकाणी काही मूर्तिकारांनी आपले बस्तान मांडले आहे. स्थानिक मूर्तिकारांसह राजस्थानातून काही कुटुंबीय या ठिकाणी आले असून विविध मूर्ती बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमूर्तिकारांकडून रात्रीचा दिवसस्थानिकांसह बंगाली व राजस्थानी बांधवांकडून जोरदार तयारीलालबागच्या राजाला मागणी

जळगाव : शहरातील अजिंठा रोडवर यावर्षीही या ठिकाणी काही मूर्तिकारांनी आपले बस्तान मांडले आहे. स्थानिक मूर्तिकारांसह राजस्थानातून काही कुटुंबीय या ठिकाणी आले असून विविध मूर्ती बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.आठ दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. त्यामुळे मूर्तिकार हे मूर्ती घडविण्याच्या कामात दिवसरात्र काम करीत आहे. यामुळे आता घरी जाणे बंदच असल्याचे स्थानिक मूर्तिकार देवीदास राठोड यांनी सांगितले.लालबागच्या राजाला मागणीसुमारे सात ते आठ फूट उंच असलेल्या लालबागच्या राजाच्या मूर्तीला मंडळांची पसंती असल्याचे हे व्यावसायिक सांगतात. यासह शिवशंकरासह मूर्ती, दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती अशा विविध प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आल्या आहेत.आकर्षक रंगसंगतीच्या या मूर्ती मन प्रसन्न करतात. आता बहुतांश कामे पूर्ण झाली असून शहरातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते मूर्तीच्या नोंदणीसाठी येथे येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील भुसावळ, वरणगाव, धरणगावसह जळगाव शहरातील विविध भागातील मंडळांचे कार्यकर्ते येथे येऊन मूर्ती नोंदणी करून गेल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.८० टक्के नागरिकांचीशाडू मातीच्या गणपतीला पसंती -घाणेकरपर्यावरण हा विषय आता बहुसंख्य व्यक्ती गांभीर्याने घेतात. खरेदीस आलेल्या ८० टक्के व्यक्तींची शाडू मातीच्या गणपतीला मागणी असते, अशी माहिती ५० वर्षांपासून या व्यवसायात असलेले दीपक घाणेकर यांनी दिली. वडील गजानन त्र्यंबक घाणेकर व आता ते स्वत: हा व्यवसाय सांभाळून आहे.पेण व कोल्हापूर येथून त्यांच्याकडे गणपती मूर्ती आणल्या जातात. या काळात एक हजार ते १२०० मूर्तींची विक्री त्यांच्याकडून केली जाते. दरम्यान ज्या व्यक्ती वर्षभर गणपतीची मूर्ती घरात ठेवतात तेच फक्त प्लॅस्टर आॅफ पॅरिसची मूर्ती खरेदी करतात.यंदा थर्माकोलची मंदिर विक्रीला बंदी आहे. त्यामुळे फायबरपासून बनविलेल्या मंदिरात लाईटिंग सोडलेली व आत मूर्ती असा अनोखा संगम असलेल्या मूर्तींना जास्त मागणी असल्याचे दीपक घाणेकर यांनी सांगितले.तसेच बैलगाडीवरील गणपती, लालबागचा राजा, दगडू शेठ हलवाई मंदिरातील मूर्तीची प्रतिकृती अशा मूर्तींनाही मागणी आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGaneshotsavगणेशोत्सव