लोकमत न्यूज नेटवर्कफत्तेपूर ता जामनेर,दि.19 - भारनियमनाच्या वेळेत बदल करावा म्हणून गेल्या पंधरा दिवसापासून आंदोलन व अर्ज विनंती दिल्यानंतरही त्याची दखल न घेतल्याने पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी 18 रोजी सकाळी 12 वाजता वीज उपकेंद्राच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.पिंपळगाव (चौखांबे) येथील भारनियमनाच्या वेळेत बदल करावा यासाठी नागरिकांकडून वीज वितरण कंपनीकडे मागणी केली जात होती. मात्र उपकेंद्राकडून कोणत्याही दाखल घेण्यात आली नाही. त्यामुळे 18 रोजी सर्व गावकरी पुन्हा वीज उपकेंद्राच्या कार्यालयात आले. याठिकाणी कनिष्ठ अभियंता राहुल चौधरी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कुणीही नव्हते. नागरिकांच्या मागणीबाबत आपल्याला निर्णय घेण्यात अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामपंचायत सदस्य आत्माराम गावंडे अमरसिंग नाईक, राजू चौधरी, अनिल पाटील, कर्तारसिंग नाईक, पंकज चोपडे, हसन तडवी, मोतीसिंग डांगर, मुकेश खराटे, प्रमोद पाटील यांनी उपकेंद्राच्या कार्यालयाला कुलूप ठोकले.सध्या गावात 14 तासांचे वीज भारनियमन आहे. संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजे पर्यत वीज बंद असते. रात्री 7 ते 12 ऐवजी 7 ते 10 असे भारनियमन करून रात्रीचे 2 तास कमी करावे अशी मागणी आहे. जो पर्यत मांगणी पूर्ण होत नाही तो पर्यत हे आंदोलन सुरु ठेऊ असी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
भारनियमनाबाबतचा प्रस्ताव सर्कल ऑफिला पाठविला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून याबाबत सुचना प्राप्त झाल्यानंतर फेरबदल करण्यात येतील. नागरिकांची मागणी पूर्ण करणे हे माङया अधिकारात नाही.
राहुल चौधरी (कनिष्ठ अभियंता फत्तेपूर )