आॅनलाईन लोकमतधरणगाव,दि.१९ : छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसरात नगरसेवक वासुदेव चौधरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला.अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ होते. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या हस्ते फीत कापून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आपल्या कडील अनावश्यक वस्तूचे दान करून गरजवंताना मदतीचा हात द्यावा म्हणून माणुसकीची भिंत असून सदर नागरिकांनी अनावश्यक वस्तू दान कराव्यात असे आवाहन नगरसेवक वासुदेव चौधरी यांनी केले आहे.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अजय पगारीया, शिवसेनेचे गटनेते विनय भावे, भागवत चौधरी, अहमद पठाण, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जानकिराम पाटील, शिवसेनेचे उपतालुका राजेंद्र ठाकरे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपशहर प्रमुख पी.एम.पाटील, विभाग प्रमुख संजय चौधरी, गजानन महाजन, तालुका संघटक सुनील चौधरी, शहरसंघटक धीरेंद्र पुरभे, युवासेनेचे उपशहर प्रमुख विलास महाजन, कमलेश बोरसे, दीपक पाटील, अल्पसंख्याक तालुका वसीम पिंजारी, उपतालुका प्रमुख नदीम काझी, वसीम पटवा,जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक शरदकुमार बन्सी, शिवसेनेचे कार्यकर्ते जितेंद्र धनगर, राहुल रोकडे, विनोद रोकडे, जयेश महाजन उपस्थित होते.
धरणगावात ‘माणुसकीची भिंत’ या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 4:21 PM
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले उद्घाटन
ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल परिसरात ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमसहकार राज्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून झाले उद्घाटनगरजवंतांना मदतीचा हात देण्यासाठी अनावश्यक वस्तू दान करण्याचे मान्यवरांचे आवाहन