जळगाव : मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाचे उत्पन्न सुरु झाले असल्याने शेतक-यांनी कापूस विक्रीसाठी काढला आहे. व्यापा-यांनी देखील अनंत चतुर्थीचा मुहूर्त साधत काटा पुजन करीत पहूर, गणेशपूर, गोंडगाव येथे खरेदीचा शुभारंभ केला आहे.पहूरला ६०५१ रुपये भावपहूर येथे कापुस खरेदीचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख यांच्या हस्ते रविवारी झाला. कापूस खरेदीच्या महुर्तावर सहा हजार एकावन्न रूपयाचा भाव शेतकºयांना देण्यात आला आहे. विठ्ठल मांगो पाटील व प्रकाश रामधन पाटील या व्यापाºयांकडून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे.गणेशपूर येथे ५६०० रुपये भावाने खरेदीगणेशपूर येथील कापसाचे व्यापारी गोपाल पाटील यांनी कापसाची खरेदी सुरु करीत ५६०० रुपये दिला. यावेळी शेतकरी दशरथ शेलार व मांगो पाटील यांच्या हस्ते काटापुजन झाले. यावेळी शिवाजी शेलार, भास्कर पाटील, हिम्मत पाटील, गोकुळ पाटील उपस्थित होते.गोंडगाव येथे कापसाला ६१०० रुपये भावगोंडगाव येथे अनंत चतुर्थीच्या निमित्ताने कापसाला ६१०० रु. प्रतिविक्टंल चा भाव मिळाला. चाळीसगाव तालुक्यात अद्याप कुठेच खरेदी सुरू झाली नाही. व्यापारी इंदल भिमराव पाटील यांनी कापसाची खरेदी सुरू केली आहे. शेतकरी पांडुरंग निंबा पाटील यांनी ५६ किलो पाहिल्या वेचणीचा कापूस दिला.
जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 11:13 PM
मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाचे उत्पन्न सुरु झाले असल्याने शेतक-यांनी कापूस विक्रीसाठी काढला आहे.
ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी साधला अनंत चतुर्थीचा मुहूर्तपहूर, गणेशपूर, गोंडगावात काटा पुजनगोंडगाव येथे कापसाला सर्वाधिक ६१०० रुपये भाव