ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 20 - जळगाव महानगरपालिकेकडून नागरिकांच्या समस्यांसाठी ‘स्मार्ट जळगाव अॅप’ व ‘कॉल सेंटर’ सुरु करण्यात आले असून या सेवेचा शुभारंभ शनिवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आला.या वेळी महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, आयुक्त जीवन सोनवणे, मनपा स्थायी समिती सभापती वर्षा खडके आदी उपस्थित होते. मनपाकडून सुरू करण्यात आलेल्या कॉल सेंटरवर जळगावकर आपल्या समस्या पाठवू शकणार आहेत. त्या समस्यांचे तत्काळ निरसन करण्यावर मनपा प्रशासनाकडून भर दिला जाणार आहे. या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, कॉल सेंटर सुरू केल्यानंतर जनतेकडून प्रश्नांचा भडीमार होणार आहे. त्यामुळे मनपाने जनतेच्या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागणार आहे. मनपाकडून नागरिकांच्या सुविधेसाठी तंत्रज्ञानाचा वापर कमीत-कमी खर्चात होत आहे. आता हे अॅप सुरू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी चांगल्या पध्दतीने करण्याची जबाबदारी सर्व अधिका:यांसोबत नगरसेवकांची असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर नितीन लढ्ढा म्हणाले की, प्रशासनातील अधिका:यांनी जर विचार केला तर जळगाव शहर स्मार्ट होवू शकते. यासाठी भविष्यात प्रशासन व लोकप्रतिनीधींचा समन्वय साधून जळगाव शहर स्मार्ट करून दाखवू असा संकल्प महापौरांनी केला. तसेच आयुक्त पुढील महिन्यात निवृत्त होत असल्याने त्यांचा कार्यकाळ 2 वर्षानी वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्र्याना पत्र पाठविणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तर मनपा आयुक्त जीवन सोनवणे म्हणाले की, या अॅपमुळे शहरातील समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे. शहरातील समस्यांबाबत सुरु करण्यात आलेल्या कॉल सेंटर सेवेचा शुभारंभ जिल्हाधिका:यांनी पहिला कॉल करून केला. 1 जून र्पयत हे सेंटर प्रायोगिक तत्वावर सुरु राहणार असून 1 जूननंतर ही सेवा जळगावकरांसाठी सुरू होणार आहे.
‘जळगाव स्मार्ट अॅप’, कॉल सेंटर’ चा शुभारंभ
By admin | Published: May 20, 2017 5:52 PM