चाळीसगाव : शासकीय हमीभावानुसार ज्वारी व मका खरेदी केंद्राचा शुभारंभ शासकीय गोदामात मंगळवारी दुपारी करण्यात आला. हे केंद्र शेतकरी संघातर्फे सुरु करण्यात आले आहे. शेतकरी संघाचे अध्यक्ष व जि.प.चे राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे यांच्या हस्ते काटा पूजन झाले.या प्रसंगी ज्वारी २ हजार ४०० रुपये तर मका १ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्यात आला. शेतकऱ्यांनी स्वच्छ व कोरडा माल विक्रीसाठी आणावा यासह संघाच्या कार्यालयात आॅनलाईन सातबारा उतारा व आधार कार्ड झेरॉक्स प्रत घेऊन आॅनलाईनने नोंदणी करावी असे आवाहन साळुंखे यांनी केले आहे.खरेदी केंद्र शुभारंभ प्रसंगी तहसीलदार कैलास देवरे, संघाचे संचालक जगतसिंग पाटील, कृष्णराव देशमुख, नानासाहेब पाटील, सतीश महाजन, अजय आव्हाड, गोदाम व्यवस्थापक भालेराव, रवींद्र पाटील, किशोर पाटील, संघाचे व्यवस्थापक टी.डी.वाघ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
चाळीसगाव येथे शासकीय धान्य खरेदीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 1:28 AM
चाळीसगाव येथे शासकीय हमीभावानुसार ज्वारी व मका खरेदी केंद्राचा शुभारंभ शासकीय गोदामात मंगळवारी दुपारी करण्यात आला. हे केंद्र शेतकरी संघातर्फे सुरु करण्यात आले आहे.
ठळक मुद्देज्वारी २ हजार ४०० रुपये तर मका १ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्यात आला. केंद्र शेतकरी संघातर्फे सुरु करण्यात आले आहे.