ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 11- तालुक्यातील जळके येथे या वर्षाच्या जलयुक्त शिवार अभियान टप्पा क्र. 3 अंतर्गत नाला खोलीकरन कामाचा शुभारंभ सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांच्याहस्ते 11 जानेवारी रोजी झाला. जळगाव जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत 222 गावांची निवड करण्यात आलेली असून त्या पैकी जळगाव तालुक्यात 12 गावांसाठी 171 कामांचा समावेश आहे. तालुक्यात सदर कामांसाठी 2 कोटी 68 लाख एवढा निधि मंजूर आहे. जलके या गावात सुमारे 28 लाखाच्या 20 कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात जलयुक्त कामाचा शुभारंभाचा मान जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळके या गावाला मिळाला आहे. विशेष म्हणजे राज्यात प्रथमच जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांच्या खास उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, माजी सरपंच रमेश जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील, विकासोचे सदस्य पी.के. पाटील आदी उपस्थित होते.