आॅनलाईन लोकमतरावेर,दि.२३ : डॉक्टरांच्या कटप्रॅक्टीसविरूध्द येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा करणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी येथे केले. पुढील वर्षीच्या मार्चमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन जळगावात वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ करणार असल्याचेही त्यांनी घोषीत केले. एका हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे होते.प्रास्ताविक डॉ. सुरेश पाटील यांनी केले. डॉ चंद्रदीप पाटील यांनी गोरगरीब व गरजू रुग्णांना वेळप्रसंगी मोफत सेवा देण्याची भावना व्यक्त केली. डॉ. सरोदे यांनी गिरीश महाजन यांच्या कार्याचे कौतुक केले.राज्य माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, आपले राज्य मोतीबिंदुमुक्त करण्याचा संकल्प घेतला आहे. देशात पहिल्यांदांच आपण सर्व वैद्यकीय पॅथीचे महाविद्यालय व त्याचे संशोधन केंद्र असलेल्या रुग्णालयाचा मेडीकल हब मंजूर करून आणले. जिल्ह्यासाठी ही मोठी बाब आहे, असे ते म्हणाले. जळगाव लगत एक हजार हेक्टरवर उभारण्यात येणाºया मेडीकल हबसाठी दीड हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी अन्य देशांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनात डॉक्टरांच्या कटप्रॅक्टीस विरुद्ध कायदा : गिरीश महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 7:28 PM
जळगावात मार्च महिन्यात होणार वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभ
ठळक मुद्देजळगावात सर्व वैद्यकीय पॅथीचे महाविद्यालयमार्चमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन जळगावात वैद्यकीय महाविद्यालयाचा शुभारंभडॉक्टरांच्या कटप्रॅक्टीसविरूध्द येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा