चाळीसगाव : शहराला गिरणा धरणावरून पाणी पुरवठा होत असलेल्या नगरपरिषदेच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या पाईपलाईनच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शुक्रवारी सकाळी ही बाब पालिका प्रशासनाच्या लक्षात आली. त्यामुळे तातडीने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, विश्वास चव्हाण, पालिका पाणी पुरवठा अभियंता संजय आहिरे, कैलास आगोने, दिपक देशमुख यांच्यासह कर्मचारी यांनी गळती होत असलेल्या ठिकाणी भेट दिली.दरम्यान, पाईपलाईनच्या दुरुस्तीला ३६ तास लागणार असल्याचे नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी सांगितले.धुळे बायपास चौकातून मालेगाव चौफुलीकडे जाताना जगदीश अग्रवाल यांच्या नियोजित मंगल कार्यालया समोर ही पाईपलाईन फुटली आहे.दरम्यान, तिच्या दुरुस्तीसाठी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सर्व यंत्र सामुग्री व तज्ञांची व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे शहराचा नियमित पाणी पुरवठा खंडित होणार नाही, असे सांगण्यात आले असले तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले आहे.शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जल वाहिनीला सकाळी गळती लागल्याचे समजले. ही गळती नगर पालिकेच्या जलवाहिनीला झालेली आतापर्यंतची सर्वात मोठी गळती आहे. त्यामुळे सर्व पाणीपुरवठा विभाग या दुरुस्तीसाठी कामाला लागला आहे, तरीही या दुरुस्तीसाठी ३६ तास लागू शकतात. नागरिकांनी घरातील पाणी जपून वापरावे.
चाळीसगाव पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:09 AM
चाळीसगाव शहराला गिरणा धरणावरून पाणी पुरवठा होत असलेल्या नगरपरिषदेच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या पाईपलाईनच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गळतीला दुरूस्त करण्यासाठी ३६ तास लागतील असे सूत्रांनी कळविले आहे.
ठळक मुद्देदुरूस्तीला लागणार ३६ तासपाईपलाईनच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह