पाल : पालपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावरील यावल प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीत नीलगायीची शिका:यांनी गोळ्या मारून हत्या केल्याची बाब उघड झाली, असून वनमजुरांना पाहताच शिका:यांनी पळ काढला़रविवारी सकाळी 11 वाजता ही घटना उघडकीस आली़ छ:र्याच्या गावठी बंदुकीने शिका:यांनी नीलगायीवर गोळी चालवण्याचा आवाज ऐकताच वनमजूर धावल़े त्यांना काही शिकारी नीलगायीची मान कापताना दिसताच, त्यांनी आरडा-ओरड केल्याने त्यांनी पळ काढला़ नीलगायीच्या पुढच्या व मागच्या पायांना गावठी बंदुकीचे छर्रे लागल्याचे दिसून आल़े शिका:यांनी नीलगायीच्या मानेवर वार केल्याने तिचा मृत्यू झाला़ वढोदा वनक्षेत्रात आढळून येणा:या नीलगायी प्रथमच पाल वनपरिक्षेत्रात आढळून आल्या असल्या, तरी या भागात पुरेशी गस्त होत नसल्याने शिका:यांचे फावल्याचे बोलले जात आह़े यावल येथे नीलगायीचे शवविच्छेदन झाल़े
नीलगायीची गोळ्या मारून शिका:यांकडून हत्या
By admin | Published: May 29, 2017 1:10 AM