रावेर : हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत बोगस विमाधारक लाभार्र्थींमुळे विमा कंपन्यांचा घाट्यात सौदा होऊ लागल्याने शासनाचा उपक्रम असलेल्या तथा खासगी विमा कंपन्या काढता पाय घेऊ लागल्या होत्या. त्या अनुषंगाने शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संरक्षित विमा अदा करताना जास्तीची झळ बसू नये यासाठी ४१ हजार रुपयांवरून नऊ हजार रुपयांवर तर ६५ हजार रुपयांवरून १० हजार रुपयावर रक्कम आणून विमा कंपन्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला. तथापी हा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे. त्याउलट ज्या शेतकऱ्यांनी निव्वळ विमा हप्ता भरून शेतात केळीचे खोड लावले नसेल वा ज्या शेतगटाला चक्रीवादळाचा फटका न बसता कोणतेही नुकसान झाले नसेल अशा बोगस लाभार्थींना संरक्षित विम्याची रक्कम अदा न करता थेट कायदेशीर कारवाई करावी व नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना गतवर्षीप्रमाणे नुकसानीचे निकष कायमस्वरूपी लागू करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.
फळपीक विमा योेजनेत चोर सोडून सन्याशाला फाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:24 PM