अध्यक्षस्थानी गुणवंत कामगार किशोर तळेले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. लक्ष्मी भारती, कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर होते. प्रास्ताविक कल्याण निरीक्षक भानुदास जोशी यांनी केले.
व्याख्याते डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे समुपदेशक बबन ठाकरे यांनी कोरोनापासून कसा बचाव करावा व लाॅकडाऊनमुळे कामगार आर्थिक विवंचनेतून जात असल्याने त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी टिप्स दिल्या. यामध्ये माईंड फुलनेस सराव, सकारात्मक विचार, एकाग्रता याबाबत मार्गदर्शन केले. दुसरे व्याख्याते तारीक शेख यांनी योग करणे, ध्यानधारणा करणे, विविध छंद जोपासणे असा सल्ला दिला.
केंद्र संचालक नरेश पाटील यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी सुरेखा बडगुजर, भारती भैरव, रती कुलकर्णी यांनी सहकार्य केले.