भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं.नहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या कला शाखेतील समाजशास्त्र विभागातर्फे सामाजिक शास्त्रातील नवप्रवाह सप्ताह अंतर्गत ८ ते १४ जानेवारी दरम्यान व्याख्यानमाला आयोजित केली आहे.यात ८ रोजी प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील यांचे इतिहास लेखनातील नवे प्रवाह, ९ रोजी प्रा.ज.सा. पाडवी यांचे धर्म, सत्ता आणि राजकारण, १० रोजी प्रा.सी.पी.लभाणे यांचे समाजातील राजकीय उदासीनता : एक समस्या, ११ रोजी डॉ.सरस्वती रटकल्ले यांचे उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह, १२ रोजी प्रा.एस.व्ही.पडलवार यांचे सामाजिक शास्त्रातील बदलते नवप्रवाह तसेच १४ रोजी प्रा.व्ही.डी.पाटील यांचे एकविसाव्या शतकातील गुंतवणुकीचे नवप्रवाह या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आले आहे.या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील तसेच प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे उपस्थित राहतील. समारोप प्रा.व्ही.डी.पाटील यांच्या हस्ते होईल. हा कार्यक्रम समाजातील सर्वांकरिता खुला असून, उपस्थितीचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
भुसावळ येथे ‘सामाजिक शास्त्रातील नवप्रवाह सप्ताहा’त व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 4:08 PM
भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओं.नहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या कला शाखेतील समाजशास्त्र विभागातर्फे सामाजिक शास्त्रातील नवप्रवाह सप्ताह अंतर्गत ८ ते १४ जानेवारी दरम्यान व्याख्यानमाला आयोजित केली आहे.
ठळक मुद्दे८ ते १४ जानेवारी दरम्यान विविध उपक्रमविविध विषयांवर तज्ज्ञ करणार मार्गदर्शन