संजय हिरे ।खेडगाव, ता.भडगाव : येथील देवेश रामकृष्ण पाटील या १४ वर्षाच्या बालकाने मागील सात महिन्यापासुन दुष्काळाशी सामना करीत,गावातील सांडपाण्यावर आपल्या लिंबुबागेला जिवदान दिले आहे. वडीलांच्या मृत्युपश्चात त्यांचे हिरवे स्वप्न साकारत खऱ्या अथार्ने मातृ-पितृ धर्म निभावत काळ्या आईच्या सेवेचे व्रत निभावले आहे.यंदाचा दुष्काळ भुमीपुत्रांची कसोटी पाहणारा ठरला. खेडगाव येथील देवेश साठी तर तो दु:ख दायक अन् तितकाच दाहक ठरला. ऐन दिवाळीत वडीलांचा अचानक मृत्यू आला. पितृछत्र हरवल्याने कोवळ्या वयात कुंटुंबासह तो ऊन्हात आला. शेतकरी कुंटुंबासाठी घरातील कर्त्या व्यक्तीचे मरण भयानक असते. बळीराजाला मातीशी गाठ, निसगार्शी सामना अन् सगळ्याच आघाडीवर लढावे लागते.देवेशने इथे मात्र दुष्काळावर मात केली आहे. दिवसभर नुसतेच उंडारणाºया किंबहुना मोबाईलमधे बोटे घालणाºया बालकांना ही काळ्याआईच्या सेवेची कथा निश्चितच प्रेरणादायी ठरावी.यंदा भर पावसाळ्यात विहीरीं कोरड्याठाक होत्या. देवेशच्या वडिलांनी गावकुसाला असलेल्या पायविहीरीचे पाणी डब्ब्याने आणुन कसाबसा हिवाळा काढला. दिवाळीच्या दिवशी त्यांचे निधन झाले. वडीलांचे सर्व विधीकर्म पार पडल्यावर दु:ख बाजुला सारत देवेशने शेतात पाय ठेवला. पाच एकरावरील शेती दुष्काळाने कोरडीच रिकामी पडुन होती. तिची चिंता नव्हती. पण एकरावरील लिंबु बाग जगविण्याची आपल्या वडिलांची इच्छा त्याला सतावत होती.अशा वेळेस काही जण तरी मदतीला धावतात. अर्धा कीमीवर गावातुन वाहणाºया नाल्याला सांडपाण्याचे डबके आहे. तिथे त्याला छोटी मोटर ठेवण्याचा सल्ला दिला. पाच हजार रुपयात आईच्या वडीलांनी मालेगावहुन नळी आणली आणि सांडपाणी शेताला दिले. ऐन दुष्काळात चांदण पडाव त्यासम ज्वारी चमकु लागली. सहा पोते ज्वारी व चारा झाला.सांडपाण्यावर छोट्या मोटरच्या साहाय्याने ज्वारी घेतली. तसेच बागही जगवली. शेतीतज्ञांना देखील तोंडात बोट घालण्यासारखेच हे उदाहरण आहे.अन् मातेला दिसू दिला नाही शेताचा बांधआई हिरकणबाईचा पती हयात होता तेव्हा दिवस शेतावरच जाई. मात्र त्यांच्या निधनानंतर आजवर तरी देवेशच आपल्या विभक्त असलेल्या काका दिगंबर यांच्या सल्ल्याने शेती सांभाळतोय. हिरकणबाई अजुनही शोकमग्न, दु:खी मनस्थीतीत असल्याने घरीच असते. नुकत्याच ऊन्हाळी सुट्या सुरु आहेत. देवेशचे इतर सवंगडी सुट्टीची मजा लुटण्यात मग्न असतांना त्याची सुट्टी मात्र शेतावरच सत्कारणी लागत आहे. अभ्यासाचे म्हणाल तर चांगल्या गुणांनी तो आठवी पास झालाय.पितृछत्र हरपले तसे देवेशचे बालपण करपले पण अठ्ठेचाळीस डिग्रीसेंटिग्रेडवर जाणारा तापमानाचा पारा चढुनही त्याने वडिलांनी लावलेली आपली बाग ऐन दुष्काळातही करपु दिली नाही. स्वगार्तील देवेशच्या वडिलांचा आत्मा देखील निश्चितच हरखला असणार..! यालाच म्हणतात मातृ-पितृ अन् कुणब्याचा शेती धर्म.
गाव सांडपाण्यावर जगवली लिंबुबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 8:31 PM