फत्तेपूर, ता. जामनेर : येथे मृतावस्थेत बिबट्या आढळून आला. साधारणपणे आठ दिवसापूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान, बिबट्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. व्हीसेऱ्याचा अहवाल आल्यानंतरच बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, असे सूत्रांनी सांगितले.याबाबतची माहिती अशी की, येथून सहा ते सात कि.मी. अंतरावरावरील मनोज सुपडू देशमुख यांच्या मालकीच्या गट नंबर.५८/३ या मक्याच्या शेतात नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. शेत जमीन ही गोद्री शिवारात आहे. शेती कामगारांना शेतात मृतावस्थेत पडलेला बिबट्या दिसला त्यांनी लागलीच ही बाब शेतमालक यांना कळविली.शेतमालक मनोज देशमुख यांनी वनविभागाला भ्रमणध्वनीवरून ही घटना कळविली असता घटनास्थळी सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी एन.जी.पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील आपल्या वनकर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह दाखल झाले. मृत बिबट्याचा घटनास्थळीच पंचनामा केला. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्याचा व्हीसेरा काढून घटनास्थळीच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.या बाबत वनविभागा कडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार बिबट्या नर जातीचा असून तो साधारण पणे सात ते आठ वर्षे वयाचा असावा.व्हिसेराचा अंतिम अहवाल आल्यानंतर कळेल की बिबट्याचा मृत्यू हा नेमका कोणत्या कारणाने झाला आहे.बिबट्याचा मृत्यू हा साधारणपणे सात ते आठ दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.मोहरदला बिबट्याचा थरारबिडगाव, ता.चोपडा- येथून जवळच असलेल्या मोहरद येथे रात्रभर बिबट्याच्या थराराने घबराटीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गोºहा ठार झाला आहे. सुदैवाने शेतकरी सुखरुप बचावला आहे.मंगळवार रात्री ९ च्या सुमारास शेतशिवारात बिबट्याने चांगलाच धुडगुस घातला. बांधलेल्या गुरांपैकी दीड वर्षाच्या गोºह्यावर हल्ला चढवून त्याचा नरडाच फोडला. यात तो ठार झाला.याबाबत सविस्तर असे मोहरद येथील भाऊसाहेब गिरधर पाटील यांचे गावाला लागुनच खंडणे शिवारात नाल्याच्यावर ताजोद्दीन बाबांच्या दर्ग्याजवळ शेत आहे. शेतात ते बैलजोडी गाय व गोºहा बांधतात व तेथेच झोपतात. नेहमीप्रमाणे ते रात्री शेतात झोपायला गेले असता त्यांना समोरच बिबट्या गोºह्यावर हल्ला करतांना दिसला. त्यांनी घाबरून आरडाओरड केली असता बिबट्याने थेट त्यांच्यावर चाल केली.घाबरलेले पाटील हे बैलगाडीवर चढले व बॅटरीचा प्रकाश त्यावर टाकला बिबट्याने पुन्हा गोºह्यावर हल्ला करून त्याचा नरडाच फोडला. यात गोºहा ठार झाला. यावेळी पाटील यांनी गावात फोन केला.तेव्हा गावातून योगेश भाऊसाहेब पाटील, चंद्रकांत धर्मराज पाटील यांच्यासह ग्रामस्य आले.त्यांनी जेमतेम बैलजोडी, गाय व जखमी गोºहा व भाऊसाहेब पाटील यांना गावात नेले मात्र शिकार हातातून गेल्याने चवताळलेला बिबट्या या परिसरातच डरकाड्या फोडत होता. त्याचे मोठे मोठे डोळे बॅटरीच्या प्रकाशात दिसत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.
गोद्री शिवारात बिबट्या सापडला मृतावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 4:32 PM