रिंगणगाव, ता.एरंडोल :या येथील पोल्ट्री फॉर्म परिसरात एका मक्याच्या शेतात पाणी देणा: शेतक:यास बिबटय़ा दिसल्याने परिसरात खळबळ माजली आहे. रिंगणगाव - पाळधी मार्गालगत पोल्ट्री फार्मजवळ अजरुन भगवान चव्हाण यांचे शेत आहे. सदर शेत पिंपळकोठा (प्र.चां.) येथील शेतकरी दत्तू छन्नू पाटील यांनी खेडायला घेतले आहे. या शेतात मक्यास पाणी देत असताना 4 रोजी दुपारी चारच्या सुमारास त्यांना शेतात अचानक बिबटय़ा दृष्टीस पडला. बिबटय़ाला पाहताच त्यांनी गावाकडील लगतच्या शेतक:यांकडे धाव घेतली आणि सावदे, रिंगणगाव, पिंपळकोठा (प्र.चां.) परिसरात बातमी वा:यासारखी पसरली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोर्पयत बिबटय़ा तेथून पसार झाला होता. ऐन शाळा सुटण्याच्या वेळेस घटना लक्षात आल्याने रे.ना. पाटील विद्यालयाच्या शिक्षकांनी विद्याथ्र्याबरोबर जाऊन थेट पिंपळकोठा व सावदे येथे घरी पोहचते केले. मात्र रात्री-अपरात्री शेतात जाणा:या शेतक:यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पिंपळकोठा प्र.चां. येथील नागरिक समाधान प्रल्हाद पाटील यांनी एरंडोल वनविभागात सदर घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे दिली. मात्र कर्मचारी व अधिकारी जळगाव येथे मिटिंगला गेल्यामुळे आम्ही येऊ शकलो नव्हतो, मात्र यानंतर बिबटय़ाचा शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.परिसरात जास्त करून मका पिकाची लागवड झाली असून या उंच वाढणा:या पिकास पाणी देताना शेतक:यांना भीती वाटत आहे. परिसरात बिबटय़ाचा शोध घेऊन वनविभागाने लवकरच बंदोबस्त करावा व नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी परिसरात होत आहे. (वार्ताहर)
रिंगणगाव शिवारात आढळला बिबटय़ा
By admin | Published: January 07, 2017 12:27 AM