आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि. १७ : गिरणा खोºयात दहशत माजविणाºया नरभक्षक बिबट्याची शोध मोहिम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यासाठी ड्रोन कॅमेरे, शार्प शुटर यांच्यासह ३५ जणांची टीम परिसरात गस्त घालत आहे.शुक्रवारी सकाळपासून बिबट्याचा शोध सुरु करण्यात आला आहे. सकाळी वरखेडे येथे दाट झाडी, ऊसात बिबट्याला शोधण्यात आले. तिरपोळे भागात एका बैलगाडी चालकाला तो दिसल्याने वनविभागाची सर्व कुमक दुपारी एक वाजता या परिसरात पोहचली होती. नगरसेवक भगवान पाटील यांच्या तिरपोळ येथील शेतात बिबट्यासाठी सापळा लावण्यात आला आहे. याच परिसरात दाट झाडीमध्ये हालचाल दिसून येत असल्याने टीम ठाण मांडून बसली आहे.तीन महिन्यात चार जणांचे बळीगेल्या तीन महिन्यात नरभक्षक बिबट्याने या परिसरातील चार जणांचे बळी घेतले आहे. जनावरांचाही फडशा पाडला आहे. बुधवारी वरखेडे येथील २५ वर्षीय महिलेवर झडप घालून तिला ठार केले. बिबट्याचा शोध घेण्यासाठी चाळीसगाव प्रादेशिक विभागाच्या कर्मचा-यांसह पारोळा, पाचोरा येथील वनविभागाचे एकुण ३५ कर्मचारी नियुक्त केले आहे. प्रत्यक्ष बघणाºयांच्या सांगण्यावरुन तिरपोळ येथे बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे. ड्रोन कॅमेºयात बिबट्याचा शोध लागलेला नसल्याची माहिती चाळीसगाव प्रादेशिक वनविभागाचे संजय मोरे यांनी दिली.नागरिकांनी सहकार्य करावेबिबट्याचा शोध घेण्याची प्रक्रिया अत्यंय गुंतागुंतीची आहे. नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करुन व्यत्यय आणत असल्याने शोध मोहिमेत अडचणी येत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शोध मोहिमेत सहभागी वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे व संजय मोरे यांनी केली आहे.
वरखेडे, तिरपोळे परिसरात बिबट्याची शोध मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 4:24 PM
शार्प शुटर व ड्रोन कॅमेºयाद्वारे ३५ जण घालताहेत वनगस्त
ठळक मुद्देबिबट्याच्या शोधासाठी ३५ जणांची नियुक्तीड्रोन कॅमेºयाद्वारे बिबट्याला शोधण्यात अपयशनागरिकांनी सहकार्य करण्याचे वनविभागाने केले आवाहन