भडगाव : शिवारातील एरंडोल रस्ता फार्महाऊसजवळ बिबट्या पिल्लांसह फिरताना एका शेतकऱ्यास दिसला. यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.सूत्रांनुसार, सोमवारी सायंकाळी पाचला कासोदा रस्त्यावरील टीसीडी फार्म मध्ये काम करताना इनुस अब्बास पिंजारी याना कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला व पिंजारी हे त्या दिशेने गेले. पाहताच त्याना बिबट्या व त्याचे पिल्लू दिसले. त्यांच्या समय सुचकतेमुळे मोठी घटना टळली. त्यांनी त्यांच्या रमजान पिंजारी व दस्तगीर पिंजारी या दोन भावांना बोलावले. त्यांनी बिबट्या व त्याचे पिल्लू पाहिले. त्यांनीच नव्हे तर अविनाश पाटील, डिगंबर पाटील यांनीही पाहिले. बिबट्या व त्याचे पिल्लू सुमारे अर्धा तासापर्यंत तेथेच होते. त्यांनी वनविभागास कळवले. परंतु वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी फिरकलेच नाहीत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली.
भडगाव शिवारात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 14:18 IST
शिवारातील एरंडोल रस्ता फार्महाऊसजवळ बिबट्या पिल्लांसह फिरताना एका शेतकऱ्यास दिसला.
भडगाव शिवारात बिबट्याचे दर्शन
ठळक मुद्देनागरिकात भीतीचे वातावरणअनेक शेतकऱ्यांनी पाहिले बिबट्याला