चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील ओढरे येथे ११ रोजी दुपारी बिबट्या मृतावस्थेत आढळला. १२ रोजी बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याचा व्हिसेरा नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.मृत बिबट्या हा नर असून त्याचे वय अंदाजे नऊ ते १० महिने असावे. तो शेतकरी छगन निकम यांच्या ओढरे शिवारातील शेतात आढळला होता.गुरुवारी सायंकाळी घटनास्थळीचा पंचनामा करून त्याला शासकीय वाहनाने चाळीसगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालय आवारात आणण्यात आले. १२ रोजी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एम.बी.गंदीगुडे, डॉ.संदीप भर,डॉ. दीप्ती कच्छवा, डॉ.योगिता अमृतकार यांनी शवविच्छेदन केले. यावेळी जळगाव वनविभागाचे वनसंरक्षक सी.आर.कामडे ( रोहयो व वन्यजीव),चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वनपाल प्रकाश देवरे घोडेगाव, वनपाल आर.व्ही.चौरे, आर.आर.कुळकर्णी, एस.बी.चव्हाण, प्रवीण गवारे, अजय महिरे, राहुल पाटील, सुरेश पगारे, के.एम.बडूरे, संजय जाधव, यु.एस.पाटील, पी.के. चिम आदींच्या समक्ष मृत बिबट्याला वनक्षेत्र कार्यालयाच्या पटांगणात मानाने अग्नीदाह देऊन अंत्यसंस्कार करण्यात आला. शुक्रवारी आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरू होते. या घटनेचा तपास जळगाव वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सी.आर.कामडे व वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पवार करीत आहे.मृतावस्थेतील तिसरा बिबट्यापंचनामा करताना बिबट्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळल्या नाही. पोस्टमार्टमच्या अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. चाळीसगाव तालुक्यातील बोढरे व रोकडे येथे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन बिबटे मृतावस्थेत आढळले होते.त्यानंतर मृतावस्थेत आढळणारा हा तिसरा बिबट्या आहे.
चाळीसगाव तालुक्यातील ओढरे शिवारात बिबट्या आढळला मृतावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 6:19 PM
ओढरे बिबट्या मृतावस्थेत आढळला.
ठळक मुद्देव्हिसेरा नाशिकला प्रयोगशाळेत पाठविणारआजूबाजूच्या शेतकऱ्यांचे जाबजबाब नोंदविण्याचे काम सुरू