आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.१०, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.अरविंद सुपडू मोरे (वय ५६, रा.पार्वती नगर, जळगाव, मूळ रा.नाशिक) यांचा धारदार करवतीने गळा चिरुन खून झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारीच घडली असावी अशी शक्यता आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ.मोरे हे १४ जून २०१७ रोजी जळगावात कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालक म्हणून रुजू झाले. त्याआधी ते धुळे जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. जिल्हा सामान्य रुग्णालय आवारात त्यांचे स्वतंत्र कार्यालय आहे. चालक जालीम जाधव यांनी सोमवारी सकाळी नऊ वाजता डॉ.मोरे यांना मोबाईलवर संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सकाळी साडे नऊ वाजता चालक जाधव हे त्यांना घेण्यासाठी पार्वती नगरातील त्यांच्या भाड्याच्या घरी गेले असता ते रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. त्यांनी ही घटना तातडीने त्यांच्या कार्यालयातील वैद्यकीय अधिकाºयांना कळविली. सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेहाच्या पायाखाली आढळली करवतघटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सहायक अधीक्षक निलोत्पल, पोलीस निरीक्षक प्रविण वाडिले यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाºयांनी घटनास्थळ गाठले. डॉ.मोरे यांच्या मृतदेह दरवाजाच्या व्हरांड्यात होता तर त्यांच्या पायाखाली धारदार करवत आढळून आली. गळा चिरल्याच्या लांबलचक खूना व गळ्याजवळ चार इंचापेक्षा जास्त खोल भोसकले होते. प्राथमिकदृट्या हा खूनच असल्याचे आढळून येत आहे, मात्र तरीही त्यांनी आत्महत्या केली असावी का? या शक्यतेनेही पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.