चंद्रशेखर जोशी ।समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या औरंगाबाद येथील सविता कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची स्थापना करून महिला, युवतींना जिनवनाची दिशा देण्याचे कार्य सुरू केले आज या कार्याची त्या जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यानुकत्याच रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या ‘सेवालय’ उपक्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त येथे ेआल्या होत्या त्यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.प्रश्न: आपल्या कार्यास सुरूवात कशी झाली?उत्तर: आपले माहेर अंबेजोगाईचे. वडिल रा.स्व. संघाचे स्वयंसेवक होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. शिक्षण घेत असताना हे बाळकडू मिळाले .प्रश्न: कार्याला दिशा कशी मळाली?उत्तर: पुणे येथे शिक्षण घेत असताना एक ग्रुप तर्याय झाला. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून कार्याला सुरूवात झाली. औरंगाबाद येथे आल्यावर डॉ. हेडेगावार रूग्णालयाच्या माध्यमातून सेवा देत असताना सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची स्थापना केली व कार्यालया दिशा मिळत गेली.प्रश्न : कार्याबाबत काय सांगाल?उत्तर : झोपडपट्टी या सेवावस्तीतून आपण कामाला सुरूवात केली. तेथील महिलांचा प्रश्न समजून घेतले. आर्थिक स्थितीमुळे हा वर्ग हतबल असतो हे लक्षात घेऊन बचत गट स्थापले. आज येथे ३०० बचत गट आहेत.प्रश्न : महिला जागृतीबाबत काय सांगाल?उत्तर : ा्रामीण भाग,शहरी सेवावस्ती परिसरातील मुलींना प्रगत करण्यासाठी शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी संस्थेने काम केले. ६० हजार मुलींना प्रगत करण्यापर्यंत संस्थेने काम केले व जागृती निर्माण केली.सेवा क्षेत्रात कार्याचे पहिले आय.एस.ओ. मानांकन आमच्या संस्थेस मिळाले आहे. या कार्यात काही महिला सहकाऱ्यांचेही योगदान आहे. त्यांच्या मदतीनेच हे कार्य वाढले.समाजातील गोरगरीबांच्या वस्त्यांमध्ये अनेक समस्या आहेत. एक वेळची भाकरी मिळविण्यासाठी त्यांची धडपड असते. अशा कुटुंबातील स्त्री स्वावलंबी झाली तर त्या कुटुंबाची दिशा- दशा बदलते असेच आपले अनुभव आहेत. -सविता कुलकर्णी
६० हजार मुलींना दिले जिवनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 10:53 AM