जळगाव- शहरातील मुलींच्या औद्यागिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) च्या विद्यार्थिनींनी नुकतेच योगाचे धडे घेतले. या योग शिबिरामध्ये तब्बल ९० विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता.मू़जे़ महाविद्यालयातील सोहम् डिपार्टमेंट आॅफ योग अॅण्ड नॅचरोपॅथीच्या योग-निसर्गोपचार पदविका अभ्यासक्रमाच्या पूजा पाटील व प्रेरणा चौधरी यांनी अभ्यास प्रकल्पातंर्गत २६ एप्रिल ते ६ मे या कालावधीत मुलींच्या आयटीआयमध्ये योग शिबिर घेतले. प्रशिक्षणार्थी म्हणून पूजा व प्रेरणा यांनी काम पाहिले़ त्यांनी तब्बल ९० विद्यार्थिंनींना अकरा दिवस रोज सकाळी एक तास योग प्रशिक्षण दिले़ अकरा दिवस चाललेल्या या शिबिराला विद्यार्थिंनींचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये ओमकार, पुरक हालचाली व त्यानंतर स्वस्तिकासन, पद्मासन, वज्रासन, विरासन, त्रिकोणासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, सर्वांगासन, हलासन, द्रोणासन, धनुरासन, ताडासन, पर्वतासन असे आदी योग प्रकार शिकविण्यात आले. तसेच अनुलोम, विलोम, भासिका प्राणायाम, क्षामरी, सित्कारी असे प्रामाणायमाचे प्रकाराचे प्रशिक्षण या विद्यार्थिंनींनी साधक विद्यार्थिनींना दिले.
आयटीआयच्या विद्यार्थिनींनी घेतले योगाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 3:00 PM
जळगाव - शहरातील मुलींच्या औद्यागिक प्र शिक्षण संस्थेच्या (आयटीआय) च्या विद्यार्थिनींनी नुकतेच योगाचे धडे घेतले. या योग शिबिरामध्ये तब्बल ...
ठळक मुद्दे९० विद्यार्थिंनींचा सहभाग योग शिबिर