संतोष सूर्यवंशी / ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 13 - माङया आजर्पयतच्या वाटचालीत आईचा सिंहाचा वाटा राहिला आहे. यश, अपयशात नेहमीच आईने धीर दिला. आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाताना धीराने जातो, अशा भावना पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे यांनी आईच्या महतीविषयी व्यक्त केल्या.मुलाच्या यशात आई-वडील या दोघांचा मोठा वाटा असतो. मात्र आईचे योगदान त्यातल्या त्यात उजवे ठरते. आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना डहाळे म्हणाले, आईचे शिक्षण जेमतेम चौथीर्पयतचे असतानाही तिने मला शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी सांगितल़े ज्यावेळी अपयश आले त्यावेळी आईने धीर दिला़ अपयश आले तरी खचून न जाता आपले प्रयत्न सुरुच ठेवण्याचा कानमंत्रही आईमुळेच मिळाल्याचेही डहाळे यांनी सांगितल़े त्यामुळे आजर्पयतच्या वाटचालीत आईचे महत्त्व अनन्यसाधारण आह़े सर्वानी आईचा आदर करावा असेही त्यांनी सांगितले आह़े आई माङया जीवनातील मुख्य आधारस्तंभ आह़े तिचा मायेचा ओलावा आपणास सतत जाणवत असतो़ आईची मायेची उब ही खूपवेळा उर्जा देवून जात असत़े आईबाबत खूप सांगण्यासारखे असून आईचे प्रेम हे शब्दात कधीच व्यक्त होत नाही़ त्यामुळेच प्रत्येकाने आईची महती नेहमीच उच्च दर्जाची ठरविली आहे.
आईच्या संस्कारातून मिळाले यशाचे धडे
By admin | Published: May 14, 2017 5:10 PM